लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जि.प.शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऐन दिवाळीच्या सुट्यांमध्ये शासनाने आॅनलाईन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. संवर्ग-३ व ४ च्या बदल्यांसाठी अर्ज भरून घेणे सुरू आहे. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड व शिक्षण सभापती संजय देशमुख यांची भेट घेवून समस्या मांडली.जिल्ह्यातील जवळपास १९00 शिक्षक संवर्ग -३ व ४ मध्ये येतात. मात्र त्यांना अर्ज भरण्यासाठी दोनच दिवसांची मुदत होती. आज ती सकाळी ११ वाजता संपली होती. मात्र सर्व्हरची अडचण लक्षात घेता बुधवारची एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे पत्र दुपारी जि.प.ला प्राप्त झाले आहे. त्यानंतर शिक्षकांतील संताप काहीअंशी कमी झाला आहे.शिक्षकांनी रात्रंदिवस एक करून अर्ज भरले. त्यामुळे जवळपास ४0 टक्के शिक्षकांचे अर्ज भरल्या गेले आहेत. इतरांना अजूनही इंटरनेट कॅफेवर सर्व्हरवर अर्ज अपलोड होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज भरण्याची प्रक्रियाही इतकी संथ गतीने सुरू आहे की, एक अर्ज भरायलाच तीन ते चार तास लागत असल्याचे शिक्षकांचे म्हणने आहे. त्यामुळे इतर कामे सोडून पूर्णवेळ इंटरनेट कॅफेत बसणे शक्य नाही. त्यामुळे वैतागलेल्या शिक्षकांनी जि.प. गाठली. सीईओ तुम्मोड यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. तर या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर शिक्षण सभापतींकडेही अवेळी होणारी ही बदली प्रक्रिया रद्द करून जि.प.कडेच शिक्षक बदल्यांचा अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे.निवेदनावर शिक्षक संघटनेचे नेते सुभाष जिरवणकर, एस.आर. भक्कड, हरिभाऊ मुटकुळे, एकनाथ कºहाळे, श्याम स्वामी, नीळकंठ गायकवाड, शंकर सरनाईक, मधुकर खणके, पांडुरंग गिरे, कुलदीप मास्ट आदींच्या सह्या आहेत.
शिक्षक बदली पोर्टलचे सर्व्हर डाऊ नच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:47 IST