शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

करदात्यांना त्रासच त्रास!

By admin | Updated: July 24, 2014 00:38 IST

औरंगाबाद : महापालिकेला प्रामाणिकपणे मालमत्ता, पाणीपट्टी आदी कर देणारे नागरिक भरपूर आहेत.

औरंगाबाद : महापालिकेला प्रामाणिकपणे मालमत्ता, पाणीपट्टी आदी कर देणारे नागरिक भरपूर आहेत. त्यांच्या आर्थिक साह्यामुळे मनपाच्या आर्थिक संकटाला थोडाफार हातभार लागतो; पण करदात्यांना त्रास देण्याचे प्रशासनाने सुरू केले आहे की काय? एखाद्या रस्त्याकडे किती वर्षे दुर्लक्ष करणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.संस्थान गणपतीशहराचे आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपतीसमोरील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. वाहनधारकांसह पायी ये-जा करणाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून महापालिकेने या रस्त्याकडे कधीच लक्ष दिले नाही. सकाळी, सायंकाळी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. जुन्या शहरात राहणाऱ्या नागरिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. महापालिकेला कर भरूनही खड्ड्यांमधून वाट काढावी लागत असल्याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली. काहींनी तर मनपाला कर भरणेच बंद करावे लागेल, असे नमूद केले. विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या सत्तेचा ‘रिमोट’ ज्यांच्या हातात आहे, ते नेतेही दर्शनासाठी अधूनमधून येतात. त्यांना हा खराब रस्ता दिसत नाही का असा प्रश्न काही सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला.बारुदगरनाला ते औरंगपुराशहराच्या कोणत्याही भागात राहणारा नागरिक औरंगपुरा भाजीमंडईत खरेदीसाठी येतच असतो. भाजीमंडईकडे येणारा एक रस्ता म्हणजे बारुदगरनाला ते सुराणा अपार्टमेंट होय. हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून मनपाने दुरुस्त केलेला नाही. यापूर्वी एकदा डागडुजी करण्यात आली होती. सध्या रस्त्यात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वीच ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू केले. त्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. रात्री तर या खड्ड्यांमध्ये चारचाकी आणि रिक्षाचालक हमखास अडकून पडतात. आसपास राहणाऱ्या नागरिकांना वाहन बाहेर काढण्यासाठी मदतीला बोलावण्यात येते. मागील आठ दिवसांपासून तर हे प्रकार खूपच वाढले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मोंढा ते अंगुरीबाग शहरातील अत्यंत जुनी बाजारपेठ असलेल्या मोंढा ते अंगुरीबाग रस्ताही वाहनधारकांच्या अंगाला काटा आणणारा आहे. मागील अनेक वर्षांमध्ये या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी डागडुजी प्रामाणिकपणे केली जाते. हा रस्ता गुळगुळीत करण्यात यावा, रस्त्यावर पाणी थांबणार नाही अशी व्यवस्था करावी, अशी व्यापाऱ्यांसह रहिवाशांची अपेक्षा आहे. महापालिकेने आतापासूनच या रस्त्याचा विचार केल्यास गणेशोत्सवापूर्वी रस्ता तयार होईल. या भागातील व्यापारी, सर्वसामान्य नागरिक दरवर्षी मनपाला शंभर टक्के कर भरतात. करदात्यांनाच त्रास देण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने स्वीकारल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. या भागातील लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.