पूर्णा : शहरात तथागत भगवान बुद्ध जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यामध्ये शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली होती. सकाळी डॉ. आंबेडकर चौक व बुद्धविहार येथे धम्म ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर बुद्ध विहारात सामूहिक बुद्धवंदना भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते घेण्यात आली. याप्रसंगी भदंत उपगुप्त महाथेरो यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, शहरातील बुद्धविहारात १५० विद्यार्थी व विद्यार्थिनी पाली भाषेचे शिक्षण घेत आहेत. हा एक चांगला उपक्रम आहे. यावर्षीपासून दरवर्षी दिवाळी व उन्हाळी सुट्यात पाली भाषेचे वर्ग घेतले जातील. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनादेखील पाली भाषा शिकता येईल. दरम्यान, शहरातील डॉ. आंबेडकर चौकातील अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी ३१ मे रोजी समाजबांधवांचा मोर्चा काढण्याचे आवाहन भदंत उपगुप्त महाथेरो यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पूर्णा पोलिस ठाण्याचे प्रभारी योगेशकुमार आयपीएस यांनी सांगितले की, अडीच हजार वर्षांपूर्वीचा बौद्ध धम्म आजही टिकून आहे. त्याला कारण म्हणजे बुद्धांचे तत्वज्ञान व बौद्ध भिक्षू यांची जनजागरण मोहीम हे आहे. धम्म टिकविण्यासाठी हे सर्व प्रयत्न करीत आहेत. यावेळी वुंगवाड यांनी सांगितले की, बुद्धाने दिलेल्या बौद्धिक परंपरेमुळे आजही बौद्ध धम्म व त्यांचे तत्वज्ञान टिकून आहे. याप्रसंगी चंद्र्र्रप्रकाश धारोड यांनी सांगितले की, बुद्ध तत्वज्ञानात जगा आणि जगू द्या,असा संदेश आहे. याप्रसंगी प्रमुख उपस्थिांमध्ये डॉ. एस. पी. गायकवाड, भंते धम्मशील, आर. एन. सावते गुरूजी, पोलिस उपअधीक्षक विश्वनाथ जटाळे, डॉ. नरवाडे, डॉ. संघमित्रा नरवाडे, नगरसेविका शीलाबाई गायकवाड, प्रकाश कांबळे, नगरसेवक देवराव खंदारे, अशोक धबाले, मनोज उबाळे, उत्तम खंदारे, अनिल खर्गखराटे, सरपंच वाटोडे, गोपाळ वाटोडे, पी. सी. रणवीर, दिलीप गायकवाड, अॅड. महेंद्र गायकवाड, राम कांबळे, चंदू साबणे, एम. यु. खंदारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्र्यंबक कांबळे, श्रीकांत हिवाळे यांनी केले. कार्यक्रमानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आला. यावेळी नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी
By admin | Updated: May 15, 2014 00:16 IST