शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

तंत्रमंत्र सम्राट फेम भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात; समस्या निवारणाच्या नावे अनेकांना लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 12:43 IST

Bhondubaba in police custody : महसूल प्रबोधनी समोरील गौतमनगर येथील लक्ष्मी टॉवरच्या गाळा क्र. ३ मध्ये बस्तान बसवले होते

ठळक मुद्देक्रांती चौक पोलिसांची कारवाई आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी

औरंगाबाद : महसूल प्रबोधनीच्या समोरील इमारतीमध्ये दुकान थाटून चार, पाच आणि दहा हजार रुपये घेऊन जादूटोणा करून उपचार करणारा उत्तर प्रदेशातील भोंदूबाबा क्रांती चौक पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. त्याच्याकडून जादूटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ( Tantramantra Samrat fame Bhondubaba in police custody; Many were robbed in the name of problem solving) 

क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक दराडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महसूल प्रबोधनी समोरील गौतमनगर येथील लक्ष्मी टॉवरच्या गाळा क्र. ३ मध्ये एक तंत्रमंत्र सम्राट मिया मुसाजी नावाने एक बाबा वशीकरण, मूठ करणी, शत्रुनास, सैतान प्रॉब्लेम, व्यसनमुक्ती, कोर्ट केस, घटस्फोट, सासू-सुनाचे भांडण, संतान समस्या, प्रॉपर्टी विवाद यावर उपचार करण्याच्या बहाण्याने बस्तान थाटले होते. तो जादूटोणा करून नागरिकांची लुबाडणूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

या माहितीनुसार निरीक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक संतोष राऊत, महादेव गायकवाड, सहाय्यक फाैजदार नसीम खान, हवालदार मंगेश पवार, नरेंद्र गुजर, अनंत कुलकर्णी, कृष्णा चौधरी यांनी घटनास्थळी छापा मारला. यामध्ये तंत्रमंत्र सम्राट मोहम्मद नईम मलीक मोहम्मद यामीन (४०) आणि शहजाद अन्सारी निरास अन्सारी (२६, रा. ग्राम इंचोली, जि. मेरठ, उत्तर प्रदेश) हे दोघे आढळून आले. भोंदूबाबाकडे विचारपूस केली असता, त्याने माहितीसाठी आलेल्या व्यक्तीकडून तपासणी शुल्क २५० रुपये घेताे. तसेच त्यांना उपचारासाठी बोलावल्यानंतर ४, ५ आणि १० हजार रुपये घेत असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडे जादूटोण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आल्यामुळे दोघांना ताब्यात घेतले. निरीक्षक डॉ. दराडे यांच्या तक्रारीवरून जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे साहित्य केले जप्तक्रांती चौक पोलिसांनी भोंदूबाबाच्या समोर छोट्या टेबलवर ठेवलेले लिंबू, अगरबत्ती, फुले, टाचण्या, दोरा, बंडल, ताट, चिल्लर पैसे, चाकू, प्लॅस्टिक बरण्यामध्ये जादूटोण्यासाठी लागणारे साहित्य सापडले आहे. याशिवाय त्याने भिंतीवर साईबाबांचे मोठे पोस्टर चिकटविलेले होते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद