शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

बोलक्या सतारीने साधला ‘शब्देविन संवादू!’

By admin | Updated: December 21, 2014 00:18 IST

औरंगाबाद : उत्कट, तीव्र, स्निग्ध, कोमल अशा अनेक भावांचा सहजाविष्कार करीत उस्ताद शुजात खान यांच्या बोलक्या सतारीने शनिवारी अवघा आसमंत भारून टाकला.

औरंगाबाद : उत्कट, तीव्र, स्निग्ध, कोमल अशा अनेक भावांचा सहजाविष्कार करीत उस्ताद शुजात खान यांच्या बोलक्या सतारीने शनिवारी अवघा आसमंत भारून टाकला. गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उस्ताद विलायत खान यांचे नातू शुजात खान यांच्या सतारस्वरांमधून रसिकांना अक्षरश: ‘शब्देविन संवादू’चा प्रत्यय आला. यासह स.भु.चे माजी विद्यार्थी व ग्वाल्हेर घराण्याचे तरुण गायक संदीप देशमुख यांनीही तळपत्या गायकीचे दर्शन घडविले. घराण्याची सात पिढ्यांची समृद्ध परंपरा जपतानाच त्यांनी गायकी अंगाने जाणारी सतार हे वैशिष्ट्य जपले आहे. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी शुजात खान यांचा सत्कार केला. प्रेषित रुद्रवार यांनी निवेदन केले. पूर्वार्धात देशमुख यांनी मारवा रागाने मैफलीचा आरंभ केला. विलंबित एकतालातील ‘शिव के सुमिरण’ व ‘प्रभू मोरे अवगुण चित ना धरो’ ही अध्धा तीनतालातील बंदिश त्यांनी नजाकतीने पेश केली. यानंतर एक तराणा घेत रूपक तालातील तिलक कमोद रागातील बंदिश गायली. शेवटी गायलेले ‘वैष्णव जन तो तेणे कहिये...’ हे भजन त्यांनी गांधीवादी गोविंदभाई श्रॉफ यांच्या स्मृतीला अर्पण केले. श्रीकांत भावे, प्रवीण कासलीकर, चैतन्य जोगाईकर व कुलभूषण कहाळेकर यांनी साथ केली. तंतुवाद्याची अंगभूत मर्यादा ओलांडत शुजात खान यांच्या गाणाऱ्या सतारीने श्रोत्यांच्या काळजाच्याही तारा छेडल्या. सुरुवातीस त्यांनी राग यमन साकारला. आलाप, जोड, झाला अशी बढत करीत विलंबित तीन तालमधील बंदिश त्यांनी सादर केली. संगीताच्या जाणकारांसह स्वरांचे व्याकरण न कळणाऱ्या सामान्यांनाही दिव्यत्वाची प्रचीती दिली. पं. भीमसेनजी आणि उस्ताद आमीरखाँ यांचे कृतज्ञ स्मरण करीत त्यांनी आपल्या गुरूंच्या आठवणींनाही उजाळा दिला. अलौकिक स्वरानुभूतीत रसिक तल्लीन झालेले असताना अवचित एका क्षणी उस्ताद शुजात खान यांनी ‘दर्शन देवो शंकर महादेव’ ही मध्य लय तीन तालमधील बंदिश छेडली. केवळ धृपद आणि अंतरा गात खर्जातल्या आवाजाने स्वरगाभारा उजळून टाकला. निर्गुण निराकाराचे अस्तित्वाच यातून खान यांनी दर्शविले. तबल्यावर साथ करणाऱ्या पं. मुकेश जाधव व खान यांच्या जुगलबंदीनेही दोन वाद्यांचे अद्भुत द्वैत साकारले. परस्परांचा तेजोभंग न करताही स्वतंत्र अस्तित्वाची झलक दाखवून या दोन कलावंतांनी भरभरून दाद मिळवली.