भोकरदन: भोकरदन-जालना मार्गवर कुंभारी पाटीजवळील गुरूकृपा गोडाऊनमधील ५ लाखांचे अॅल्युमिनियमचे १७ कंडक्टर्सचे बंडल चाकुच्या धाकाने चोरट्यांनी पळविल्याची घटना रविवारी पहाटे घडली. मात्र, भोकरदन शहरात सदरील गाडी नादुरूस्त झाल्याने चोरटे गाडी सोडून फरार झाले.भोकरदन - जालना रोडवर कुंभारी पाटी जवळ निर्मला दानवे यांचे गोडाऊन आहे. सदरील गोडाऊन हे गुरूकृपा इलेक्ट्रकील कंपनीला भाडे तत्त्वाने दिले असून, कंपनीने या ठिकाणी तालुक्यात सुरू असलेल्या महावितरण कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य ठेवले आहे. २ जुलै रोजी मध्यरात्रीनंतर २ ते ३ च्या दरम्यान या ठिकाणी ५ ते ७ चोरट्यांनी संरक्षण भिंतीवरून परिसरात प्रवेश केला. गोडाऊनमध्ये झोपलेले अमित स्वामी, गणेश जाधव, पवन रायमुले, शेख इरफान, मच्छिंद्र जाधव, रामभाऊ खाडे यांनाही चाकूचा धाक दाखवून दरवाजाच्या चाव्या घेतल्या. तसेच त्यांच्याकडील मोबाईल व रोख १० हजार रूपये घेतले. त्यानंतर अॅल्युमिनियमचे १७ बंडल (कंडक्टर) सुमारे ४ लाख ९० हजार रूपये किमतीचे साहित्य हे पिकअपमध्ये (एमएच १५ सी. के. ७८९६) टाकून भोकरदनकडे पोबारा केला. स्टोअरकिपर मच्छिंद्र गोविंद जाधव यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर वसावे, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकालाही पाचारण केले.परंतु शोध घेण्यास त्यांना अपयश आले.
तलवारीचा धाक दाखवून दरोडा; पाच लाखांचे साहित्य पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 00:09 IST