शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Talathi Exam: पर्याय सोडून दुसरेच केंद्र दिले; उमेदवारांना आर्थिक भुर्दंड

By विकास राऊत | Updated: August 22, 2023 14:08 IST

परीक्षेच्या नियोजनाचा गोंधळ; प्रशासनाचे टीसीएसकडे बोट

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनातील रिक्त असलेल्या १३८ तलाठी पदांच्या जागांसाठी ७४ हजार ७८४ उमेदवारांनी अर्ज केले असून, १७ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर २०२३ या काळात सुट्या वगळून १९ दिवस परीक्षेचे वेळापत्रक ठरविले असून, परीक्षेच्या नियोजनाचा गोंधळ उडाला आहे. परीक्षेचे पूर्ण संचलन टीसीएस या संस्थेकडे असल्याचे सांगून प्रशासनाने हात वर केले आहेत.

परीक्षेसाठी उमेदवारांनी पर्याय म्हणून दिलेल्या तिन्ही जिल्ह्यांऐवजी विदर्भ, मराठवाड्यातील केंद्र दिल्यामुळे ३ ते ४ हजारांचा प्रवासाचा भुर्दंड प्रत्येकाला बसला असून, त्यातच सर्व्हर डाऊन झाल्यामुळे परीक्षा एक तास उशिरा सुरू झाली. परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी २२ रोजी या, असे उमेदवारांना सांगितले, त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला.

शहर व परिसरातील सात केंद्रांवर सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० वाजेदरम्यान तीन सत्रांमध्ये परीक्षा होत आहे. दोन तासांचे एक सत्र अशा तीन सत्रांमध्ये परीक्षा असेल. शेड्युल्डनुसार परीक्षेची माहिती हॉल तिकीटवर आहे. सकाळी ९:०० ते ११:०० वाजेपर्यंत पहिले सत्र, १२:३० ते २:३० दुसरे सत्र, सायंकाळी ४:३० ते ६:३० तिसरे सत्र असेल. जिल्हा प्रशासनाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या १३८ जागांसाठी परीक्षा होणार असून, सात परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत आहे.

...या केंद्रांवर सुरू आहेत परीक्षाइंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट बजाज कंपनीसमोर वाळूज, वन डायरेक्शन स्किल सोल्युशन इन्फोटेक पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजजवळ, ईऑन डिजिटल झोन चिकलठाणा एमआयडीसी, एआयआयटी अक्टिव्ह इन्स्टिट्यूट ऑफ इन्फाॅर्मेशन टेक्नोलॉजी, प्लॉट नं. ८२, नाथ प्रांगण, युवान इन्फोटेक, देवानगरी, शहानूरमियाँ दर्गा परिसर, एक्सलन्स कॉम्प्युटर सेंटर, बजाज कंपनीसमोर, एमआयडीसी जलशुद्धिकरण केंद्राजवळ, वाळुज या केंद्रांवर परीक्षा सुरू आहेत.

खासगी बसेसचे दर वाढविले....अमोल नरवडे या उमेदवाराने सांगितले, खासगी बसेसने तिकिटांचे दर ३०० रुपयांनी वाढविले आहेत. त्यातच परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगून उमेदवारांना जाण्यास सांगितले. २ ते ३ हजार खर्च करून उमेदवार आले आहेत. परत ये-जा करण्याचा खर्च काेण देणार, असा सवाल परीक्षा केंद्रचालकांना केला. तसेच उमेदवारांची तपासणी विचित्र पध्दतीने केली जात असल्याचा आरोपही त्याने केला.

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग