शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

न घाबरता औरंगाबादच्या नाव बदलासाठी गुप्त मतदान घ्या, मग ठरवू : इम्तियाज जलील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 12:26 IST

सर्वसामान्य औरंगाबादकर नामकरणाच्या विरोधात आहेत. ज्यांचा या शहराशी संबंध नाही ते कुठे तरी मुंबईत बसून आमच्या शहराबाबत निर्णय घेतात.

औरंगाबाद:  शहराचे नाव बदल करण्याचा उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये झालेला निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही पुन्हा आमच्या कॅबिनेट आणू आणि पास करू असे जाहीर केले, यातून स्पष्ट होतंय की छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी होतोय. बहुसंख्य नागरिकांना शहराचे नाव बदल नकोय, न घाबरता जनमत चाचणी घेऊन गुप्त मतदान घ्यावे, असे आव्हान खासदार इम्तियाज जलील यांनी आज केले.

शहराच्या संभाजीनगर नामकरणाच्या विरोधात आज दुपारी एमआयएम मूक मोर्चा काढणार आहे. तत्पूर्वी खा. जलील यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वसामान्य औरंगाबादकर नामकरणाच्या विरोधात आहेत. ज्यांचा या शहराशी संबंध नाही ते कुठे तरी मुंबईत बसून आमच्या शहराबाबत निर्णय घेतात. फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वी या नावाची घोषणा केली म्हणून नाव बदलले गेले आहे. न घाबरता या नावासाठी गुप्त मतदान घेण्यात यावे. त्यानंतर ठरावा असे आव्हान खा. जलील यांनी केले. 

आम्ही नावाच्या विरोधात आहे म्हणजे आम्ही औरंगजेबाचे भक्त आहोत असे नाही. आम्ही सर्व महापुरुषांचा आदर करतो.औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे. युनिस्कोच्या यादीत शहर आहे. ४०० वर्षांपूर्वी काय झाले होते ते महत्वाचे नाही. आता आपल्याला पुढे जायचे आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदू-मुस्लीम असा वाद निर्माण करत आहेत. मी मूक मोर्चा एक सामान्य अभिमानी औरंगाबादकर म्हणून सहभागी होणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले. 

माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शहरात झालेल्या भाषणात पहिल्यांदा आम्ही शहराचा विकास करू असे जाहीर केले होते. सत्ता टिकविण्यासाठी जाताजाता त्यांनी हा निर्णय का घेतला. शहराचा विकास केला असता तर आम्ही नाव बदलायचा प्रस्ताव आणला असता. शहरवासियांना नोकऱ्या, पाणी पाहिजेत नाव बदलाची कोणाची मागणी नाही. आपल्याला प्राथमिकता ठरवावी लागेल, असेही खा. जलील यांनी स्पष्ट केले. सर्व राजकीय पक्ष, संघटना यांनी लोकांचे मत लक्षात घ्यावे आणि आजच्या मोर्चात लोकशाही मार्गाने सहभागी व्हावे असे आवाहन खा. जलील यांनी केले.  

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन