शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

मनपाला दिवाळखोरीतून बाहेर काढा; शासनाकडून बिनव्याजी कर्जासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:38 IST

शासकीय वित्तीय संस्थांकडून बिनव्याजी कर्ज द्यावे, अशी मागणी महापौरांतर्फे मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : विकासकामांची देयके देण्यासाठी महापालिकेकडे मागील दीड वर्षापासून पैसे नाहीत. कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा आकडा ३०० कोटीपर्यंत पोहोचला आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने ३०० कोटींचे अनुदान द्यावे, अन्यथा शासकीय वित्तीय संस्थांकडून बिनव्याजी कर्ज द्यावे, अशी मागणी महापौरांतर्फे मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे.

मागील दीड वर्षामध्ये महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. खर्च जास्त, उत्पन्न कमी, अशी अवस्था मनपाची झाली आहे. खर्चात काटकसर करण्याचे धोरणही कधीच महापालिकेने अवलंबिले नाही. जुनी थकबाकी मिळाल्याशिवाय नवीन कामे घेणारच नाही, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतली  आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज ही महत्त्वाची कामेही रेंगाळली आहेत. या गंभीर परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी राज्य सरकारच्या वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

महानगरपालिकेने यापूर्वी विविध बँकांकडून कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड केली जात आहे. मोठे कर्ज घेण्यासाठी वित्तीय संस्थांना मनपाची देयता पतचे प्रमाणपत्र द्यावे लागते. त्यास क्रेडिट पत म्हणतात. मनपाची पत तपासण्यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहरातील खासगी सनदी लेखापाल बांधवांची मदत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांनाही मनपाची देयता पत तपासण्याचे आदेश देण्यात आल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.

३०० कोटींसाठी प्रयत्नराज्य सरकारच्या वित्तीय संस्थांकडूनबिनव्याजी कर्ज घेण्यासाठी सरकारची परवानगी लागते. त्याकरिता मनपाला संयुक्त बँक खाते उघडावे लागेल. या खात्यात जमा होणारी रक्कम संबंधित बँकेच्या खात्यात जमा होईल. सुमारे ३०० कोटींच्या कर्जासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन विनंती करण्यात येणार आहे. मनपाला बिनव्याजी कर्ज मिळावे यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे महापौर घोडेले यांनी नमूद केले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीState Governmentराज्य सरकार