औरंगाबाद : सातारा परिसरात १५ टँकरची मागणी करूनही अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असून, सध्या चालू असलेल्या ६ टँकरच्या फेर्याही अपूर्णच होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आठ दिवसांत टँकरच्या संख्येत वाढ करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे. गतवर्षी या भागात १६ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मनपाच्या जलवाहिनीवरून शुद्ध पाणी पुरविले जात होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक-दोन टँकर परिसरात फेर्या मारत असून, पाणीपुरवठ्यावर मात करण्याचा प्रयत्न अपूर्ण ठरत आहे. सातारा परिसरात शासकीय, निमशासकीय कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने वास्तव्यास असल्याने त्यांना कार्यालयास दांडी मारून चार ते पाच दिवसांआड पाणी भरणे शक्य नसल्याने खाजगी टँकरच्या पाण्यावर खर्च करावा लागत आहे. एका कॉलनीतील घराला पाणी देताना १६ टँकरला तीन ते चार दिवसांचा गॅप पडत होता; परंतु यंदा शासनाकडे ग्रामपंचायतीने ठराव घेऊन फेब्रुवारीतच पाण्याच्या टँकरची मागणी केली होती. त्या मागणीकडे अधिकार्यांनी सतत दुर्लक्ष करून गत महिन्यात ३ व ४ दिवसांपूर्वी ३, असे सहा टँकर सुरू केले आहेत. प्रत्येक टँकरच्या तीन फेर्या असा दिनक्रम ठरविण्यात आला असून, खाजगी टँकरवाले पाण्याचा उपसा करून त्याची सर्रास विक्री करतात अन् शासकीय टँकरला मात्र जेमतेम फेर्या मिळत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही वाढीव टँकर अद्यापही देण्यात आलेले नाहीत. सातार्यात नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून, टँकरसाठी तहसीलवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा राहुल शिरसाट, नीलेश चाबुकस्वार, राहुल रगडे, विजय पैठणे, विश्वलता शिरसाट, आरती पाटील, लीना बनसोडे, आयुब शेख यांनी दिला.
सातार्यात पाण्यासाठी टाहो
By admin | Updated: May 31, 2014 01:14 IST