शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; अंगावर रक्त, कंबरेला अर्धवट जळालेल्या उदबत्तीने गूढ वाढले

By सुमित डोळे | Updated: September 15, 2023 12:04 IST

ऐन अमावास्याच्या रात्री उघडकीस आलेल्या घटनेमुळे परिसरात जादू टोण्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील मसनतपूरमध्ये राहणाऱ्या गौतम मगरे (३९) यांचा बुधवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाला. रात्री कामावरून परतल्यानंतर झोपलेले गौतम सकाळी अचानक मृतावस्थेत आढळले. परंतु त्यांच्या अंगावर रक्त, त्याला लागलेल्या मुंग्या व कंबरेला अर्धवट जळालेल्या उदबत्तीमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले. डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल राखीव ठेवला. दरम्यान, ऐन अमावास्याच्या रात्रीच हा प्रकार घडल्यामुळे परिसरात जादू टोण्याची चर्चा जोरात सुरू झाली होती.

रामनगरातील रंगाच्या दुकानात काम करणारे गौतम दोन वर्षांपूर्वीच त्यांना पत्नी सोडून गेल्याने भावाच्या घराशेजारील खोलीत एकटेच राहत होते. बुधवारी रात्री कामावरून घरी उशिरा परतले. घरी जाताच ते झोपी गेले. गुरुवारी सकाळी बराच वेळ होऊनही गौतम बाहेर न आल्याने भावाने दरवाजा ढकलून पाहिले असता धक्कादायक चित्र दिसले. गौतम बेशुद्धावस्थेत पडलेले होते. त्यांचा आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली.

अंगावर रक्त कोणाचे? उदबत्ती कशी?गौतम यांच्या अंगावर एकही जखम आढळली नाही. मात्र, हात, पाय, चेहऱ्यावर रक्त आढळले. ते एखाद्या प्राण्याचे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रक्तामुळे त्यांच्या मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या. कंबरेच्या पॅण्टच्या हुकमध्ये उदबत्ती अडकवलेली होती. संशयास्पद वाटल्याने पहिले एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गौतम यांना तपासून मृत घोषित केले. मात्र, शवविच्छेदनाचा अहवालात मृत्यूचे कारण तज्ज्ञांच्या मतासाठी राखीव ठेवले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद