शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

इंडियन डेंटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुषमा सोनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 21:21 IST

इंडियन डेंटल असोसिएशनच्या औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी सुष्मा सोनी यांची निवड झाली. औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या त्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या.

औरंगाबाद : इंडियन डेंटल असोसिएशनच्या औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी सुष्मा सोनी यांची निवड झाली. औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या त्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. शाखेच्या सचिवपदी डॉ. राजेश जंबुरे, तर पुढील वर्षाचे अध्यक्ष म्हणून डॉ. अभिजीत चपळगावकर यांची निवड झाली. सर्व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी पार पडला.

पदग्रहण सोहळ्याप्रसंगी औरंगाबाद शाखेचे मावळते अध्यक्ष डॉ. राजन महिंद्रा, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे, डॉ. एस. सी. भोयर, ‘आयएमए’चे अध्यक्ष कुलदिपसिंग राऊळ, सचिव डॉ. यशवंत गाडे, हेडगेवार रुग्णालयाचे डॉ. सतीश कुलकर्णी, धूत हॉस्पीटलचे डॉ. हिमांशु गुप्ता आदींची उपस्थिती होती. यावेळी शहरातील डॉक्टरांची उपस्थिती होती.

‘आयडीए’ची उर्वरित कार्यकारिणी अशी आहे. उपाध्यक्ष डॉ. सिमीत शहा, डॉ. विजयकुमार गिºहे, संयुक्तसचिव डॉ. समिना बाकरी, सहसचिव डॉ. अनिरुद्ध देशपांडे, कोषाध्यक्ष डॉ. प्रणव महाजन, सहकोषाध्यक्ष डॉ. प्रितम शेलार, प्रसिध्दी प्रमुख डॉ. शिरीष खेडगीकर यांच्यासह डॉ. पूर्वा अजमेरा, डॉ. प्राची गिºहे, डॉ. सय्यद मोहम्मद अली, डॉ. अनिकेत बिडवे, डॉ. गुलझार कुडचिवाला, डॉ. अंकुश बुब, डॉ. सुशिल बनसोडे, डॉ. तुषार खियानी, डॉ. सोनिया सोधी, डॉ. महिंद्रा हंडा, डॉ. शांता कोरगावकर, डॉ. प्राजक्ता बिनायके, डॉ. अनुप चोलेपाटील, डॉ. गोविंद चांगुले, डॉ. अपेक्षा धुळे यांच्यासह अन्य डॉक्टरांची कार्यकारिणीत विविध पदांवर निवड झाली आहे.

शिक्षणात अडचणी- सौरव बॅनर्जीपदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात थ्रीडी टेक्नॉलॉजी व अ‍ॅडव्हान्स रुट कॅनॉल उपचाराची प्रात्यक्षिके मायक्रो इंडो डेंटिस्ट डॉ. सौरव बॅनर्जी यांनी सादर केली. देशाबाहेर रुग्ण व दंततज्ज्ञांना विमा संरक्षण मिळते. भारतातील दंततज्ज्ञदेखील जागतिक पातळीवर ठसा उमटवीत आहेत. परंतु आपल्याकडे शासन कोणतीही मदत करीत नाही. शासकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना रुट कॅनॉल शिकण्यासाठी आवश्यक सामग्री नसल्याची परिस्थिती विदारक आहे,असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद