शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रिया करायची? मग थोडं थांबा; घाई असल्यास पैसे भरून घ्या उपचार 

By संतोष हिरेमठ | Updated: December 9, 2023 14:33 IST

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना : तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन

छत्रपती संभाजीनगर : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत शस्त्रक्रिया, उपचार करायची आहे, असे म्हटल्यावर ‘ थोडे थांबावे लागेल, सध्या सर्व्हर डाऊन आहे’, असे उत्तर गेल्या तीन दिवसांपासून सरकारी आणि खासगी रुग्णालयांत दिले जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन यंत्रणेवर कागदपत्रेच अपलोड होत नसल्याने ‘वाट पाहा, नाहीतर पैसे भरून उपचार घ्या’ अशी स्थिती रुग्णांची झाली आहे.

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना ही महाराष्ट्राची आरोग्य विमा योजना आहे. ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून सुरू करण्यात आली. यामध्ये राज्यातील २.२ कोटी लाभार्थी कुटुंबांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे. या योजनेशी संलग्नित रुग्णालयांमध्ये या योजनेचा गोरगरीब रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ घेता येत आहे. प्रत्येक रुग्णालयात योजनेसाठी आरोग्यमित्र असतात. गेल्या तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने कागदपत्रेच अपलोड होत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी, शस्त्रक्रियेसाठी ताटकळावे लागत आहे.

‘ईटीआय’साठी धाडस होईना...अत्यवस्थ रुग्णाला तत्काळ उपचार मिळण्यासाठी ‘इमर्जन्सी टेलिफोनिक इन्फर्मेशन’ची (ईटीआय) मदत घेतली जाते. ‘ईटीआय’ घेतल्यानंतर ७२ तासांच्या आत रुग्णाची आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतात. सर्व्हर ७२ तासांनंतरही सुरु झाले नाही तर रुग्णाकडून शुल्कची आकारणी करणे त्रासदायक ठरू शकते, हा विचार करून काही रुग्णालये ‘ईटीआय’पेक्षा ऑनलाइन यंत्रणा सुरळीत होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी ताटकळावे लागत आहे.

किती रुग्णालये संलग्नित ?छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ३८ रुग्णालये एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नित आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये या योजनेचा गोरगरीब रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ घेता येतो.

घाटीत योजनेतून रोज किती रुग्णांवर उपचार?एकट्या घाटी रुग्णालयात दररोज २० ते २५ रुग्णांवर या योजनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया आणि अत्यावश्यक उपचार केले जातात. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी, उपचारासाठी यंत्रणा सुरळीत होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. ‘इमर्जन्सी टेलिफोनिक इन्फर्मेशन’द्वारे (ईटीआय) अत्यवस्थ रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे घाटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

- योजनेत समाविष्ट उपचार संख्या- १,३५६- केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव उपचार-११९- राज्यातील अंगीकृत रुग्णालयांची संख्या-१,३५०

‘ईटीआय’ने मदतसर्व्हर डाऊन असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र, गंभीर रुग्णांसाठी ‘इमर्जन्सी टेलिफोनिक इन्फर्मेशन’द्वारे (ईटीआय) माहिती कळवून उपचार केले जातात. लवकरच यंत्रणा सुरळीत होऊन कामकाज पूर्ववत होईल.- डाॅ. मिलिंद जोशी, जनआरोग्य योजना जिल्हा व्यवस्थापक

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद