शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

घाटीत एक दिवसाच्या बाळावरही ऑपरेशन; पण स्वतंत्र पेडियाट्रिक सर्जरी विभागाची प्रतीक्षाच

By संतोष हिरेमठ | Updated: November 2, 2023 19:19 IST

सर्जरी विभागातील डाॅक्टरांच्या खांद्यावर बालकांवरील सर्जरीचा भार, ‘रेफर’चीही वेळ

छत्रपती संभाजीनगर : जन्मत: श्वासनलिका, अन्ननलिका एकमेकांना चिकटलेली असणे, जन्मत: बाळाला शौचाची जागा नसणे, यासह अनेक गुंतागुंतीच्या अवस्थेतील बालकांवर घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया होतात. मात्र, बालकांच्या काही प्रकारच्या शस्त्रक्रिया या सर्जरी विभागातील डाॅक्टर करतात. काही शस्त्रक्रियांसाठी बालकांना मुंबई, नागपूर, पुण्याला रेफर करावे लागते. पेडियाट्रिक सर्जरी विभाग या स्वतंत्र विभागाची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.

बालरोग शल्यचिकित्सक आणि बालरोग मूत्रमार्ग शल्यचिकित्सकांची राष्ट्रीय परिषद २ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत शहरात होत आहे. घाटी रुग्णालयातील सर्जरी विभागातील डाॅक्टर बालकांच्या अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया करीत आहे. मात्र, स्वतंत्र पेडियाट्रिक सर्जरी विभाग सुरू झाल्यास बाल सर्जरीला, बालकांच्या उपचाराला अधिक बळ मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील पहिले बालरोग शल्यचिकित्सक होण्याचा मान केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना जातो. त्यांनीच आता घाटीत पेडियाट्रिक सर्जरी विभाग सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. गंभीर अशा बालकांना नवीन आयुष्य देणारी बालरोग शल्यचिकित्सा ही शाखा आहे. शहरात २७५ हून अधिक बालरोगतज्ज्ञ असून, केवळ १२ बालरोग शल्यचिकित्सक आहेत. मराठवाड्यात २२ बालरोग शल्यचिकित्सक आहेत.

एका युनिटमध्ये महिन्याला १० सर्जरीघाटीतील सर्जरी विभागात ६ युनिट आहेत. एका युनिटमध्ये महिन्याला किमान १० लहान मुलांच्या शस्त्रक्रिया होतात. इतर युनिटमध्येही कमी-अधिक प्रमाणात शस्त्रक्रिया होतात, तर काहींना रेफर केले जाते.

प्रस्ताव देण्याची सूचनापेडियाट्रिक सर्जरी विभागासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) प्रशासनाला केली आहे. घाटीत हा विभाग सुरू होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.- डाॅ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

प्रस्ताव देणारकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी पेडियाट्रिक सर्जरी विभागाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार आम्ही लवकरच प्रस्ताव सादर करणार आहोत.- डाॅ. संजय राठोड, अधिष्ठाता

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी