सेलू : येथील नगराध्यक्षपदी काँग्रेसचे गटनेते सुरेश कोरडे तर उपाध्यक्षपदी शाहीनबी अ़ वहीद अन्सारी यांची निवड झाली़ नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते़ तहसीलदार आसाराम छडीदार, लेखापाल अशोक कासार, सुधाकर खैरे यांची उपस्थिती होती़ नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडे सुरेश कोरडे तर शिवसेनेकडून संजय धापसे यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे अध्यक्षपदासाठी हात उंचावून नगरसेवकांनी मतदान केले़ यात काँग्रेसचे सुरेश कोरडे यांना १६ तर शिवसेनेचे संजय धापसे यांना पाच मते पडली़ उपनगराध्यक्षपदासाठी शाहीनबी अ़ वहिद अन्सारी यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली़ निवडी नंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला़ सेलूचे नगराध्यक्षपद ओबीसी साठी राखीव होते़ पालिकेत काँग्रेस १५, शिवसेना ५ व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे पक्षीय बलाबल होते़ यावेळी आ़ रामप्रसाद बोर्डीकर व माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे एकत्र आल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ १५ वर पोहोचले होते. त्यामुळे सुरेश कोरडे यांचा विजय निश्चित होता़ उपनगराध्यक्षपदी विनोद बोराडे गटाच्या शाहीन अ़ वहिद अन्सारी यांची वर्णी लावून बोराडे गटालाही संधी देण्यात आली. काँग्रेसचे सुरेश कोरडे यांना पवन आडळकर, चंद्रकला सावंत, मारोती चव्हाण, शमीमबेगम गौसोद्दीन, प्रभाकर सुरवसे, पार्वती गोरे, शाहीनबी अ़ वहिद, मुश्ताक अहेमद, बबन गायकवाड, विमलबाई तरटे, इंदुमती पवार, विनोद बोराडे, गयाबाई सोनवणे, शोभा बागल यांच्यासह राष्टवादीचे ऊरूजअली खॉ यांनी हात उंचावून मतदान केले तर शिवसेनेचे संजय धापसे यांना संदीप लहाने, मंगलताई कथले, संध्याताई चिटणीस, अन्नपूर्णाताई शेरे अशी पाच मते मिळाली़ निवडणूक निर्वाचन अधिकारी महेश वडदकर यांनी सुरेश कोरडे हे विजयी झाल्याचे घोषित केले़ (प्रतिनिधी)वृत्तपत्र विक्रेता ते नगराध्यक्षकाँग्रेसचे गटनेते सुरेश कोरडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली़ कोरडे यांनी अनेक वर्षे शिवसेनेत सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले होते़ मात्र यावेळी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते प्रभाग क्ऱ ५ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले़ त्यानंतर नगराध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांना काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी संधी दिली़ सन १९८९-९० या काळात सुरेश कोरडे यांनी सायकलवर वृत्तपत्र विक्रीचे काम केले होते़ त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिलेला आहे़ ११ जुलै रोजी त्यांना शहराचा प्रथम नागरिक होण्याचा बहुमान मिळाला.नगराध्यक्षपदी सुशीलाबाई लाडमानवत: मानवत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सुशीलाबाई बालाजी लाड यांची तर उपनगराध्यक्षपदी बाबूराव धोंडिराम हालनोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. न. प. च्या सभागृहात ११ जुलै रोजी दुपारी १२ वाजता ही निवड पार पडली. यावेळी सर्व नगरसेवकांसह काँगे्रेसचे ज्येष्ठ नेते बालकिशन चांडक उपस्थित होते. पीठासन अधिकारी म्हणून संतोष वेणीकर यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप, निवडणूक विभागप्रमुख पी. आर. कांबळे उपस्थित होते. सभेचे कामकाज अशोक नेवरेकर यांनी पाहिले. मानवत नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेस सुटले होते. सीमा शिवनारायण सारडा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सुशीलाबाई लाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. (वार्ताहर)नगराध्यक्ष निवडीचा आनंद- चांडकमानवत नगरपालिकेत मानवत नगरपालिकेत काँग्रेसचे १४ नगरसेवक आहेत. त्यामुळे काँग्रेसचाच नगराध्यक्ष होणार हे निश्चित होते. परंतु, ही निवड बिनविरोध झाल्याने या निवडीचा आनंद द्विगुणीत झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बालकिशन चांडक यांनी दिली.नागरी सुविधेस प्राधान्य देणार -लाडनगरपालिकेकडून शहरवासियांना द्याव्या लागणाऱ्या नागरी सुविधांना प्राधान्य देऊ. शहरातील साफसफाई, रस्ते, नाल्या आणि पुरवठा या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे या मूलभूत सुुविधा पुरविण्याकडे आपण लक्ष देणार असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुशीलाबाई बालाजी लाड यांनी दिली.पाथरीच्या नगराध्यक्षपदी राकाँचे जुनेद खान दुर्राणी पाथरी : पाथरीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जुनेद खान दुर्राणी तर उपनगराध्यक्षपदी राकाँचेच डॉ.राजेंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाथरी नगरपालिकेचे पुढील अडीच वर्षांचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव होते. नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी ११ जुलै रोजी न.प.सभागृहामध्ये निर्वाचन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. ८ जुलै रोजी नगराध्यक्षपदासाठी आ. बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव जुनेद खान दुर्राणी यांचा एकमेव अर्ज आला होता. आज झालेल्या सभेत उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचेच डॉ. राजेंद्र चौधरी यांचा एकमेव अर्ज आला. अध्यक्ष आणि उपाध्यपदासाठी एकच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीच्या वेळी तहसीलदार देवीदास गाडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत सोनवणे यांची उपस्थिती होती.पाथरी नगरपालिकेत १९ सदस्य असून अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने १९ पैकी १९ जागा जिंकून या नगरपालिकेवर तब्बल सहाव्यांदा आपली सत्ता काजीब केली होती. (वार्ताहर)स्वच्छतेकडे लक्ष देणार -जुनेद दुर्राणीशहरातील स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याच्या कामाकडे व्यक्तिश: लक्ष देऊन आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा करुन प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जुनेद खान दुर्राणी यांनी सांगितले. निवडीनंतर आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तबरेजखान दुर्राणी, मोईज अन्सारी, चक्रधर उगले, हन्नानखान दुर्राणी, दादासाहेब टेंगसे, शंतनू पाटील, माधवराव जोगदंड, संजय रणेर, गंगाधरराव गायकवाड, आरेफ खान, लालूखान, नारायण पितळे आदींची उपस्थिती होती.जिंतूर नगराध्यक्षपदी साधना दराडे जिंतूर : जिंतूर पालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आ. बोर्डीकर गटाच्या साधना दराडे या तर १२ मते घेऊन विजय झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी राकाँच्या कल्पना डोईफोडे यांना ६ मते मिळाली. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाहेदाबी खलील अहेमद बिनविरोध निवडून आल्या.जिंतूर नगरपालिकेत पक्षीय बलाबल राकाँ ८, काँग्रेस १२ व नागरे गट १ असे आहे. नगराध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्गाकरीता काँग्रेसच्या साधना पंडितराव दराडे व राकाँच्या कल्पना मनोहर डोईफोडे यांच्यात लढत झाली. काँग्रेसला १२ मते मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला ६ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमिना बेगम मुद्दसर खॉ व प्रताप देशमुख हे दोन सदस्य गैरहजर राहिले. तर काँग्रेसच्या सुमित्राबाई राठोड या आजारी असल्याने मतदानासाठी आल्या नाहीत. नगराध्यक्षाची निवडणूक अटीतटीची होईल, असे वाटत होते. परंतु, राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे दोन सदस्य ऐनवेळी गैरहजर राहिले. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला १२ मते मिळाली. अपक्ष नगरसेवक गजानन रोकडे यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी महिंद्रकर यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांचे आ. रामप्रसाद बोर्डीकर, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, गंगाधर बोर्डीकर, जि. प. चे माजी उपाध्यक्ष वसंतराव शिंदे यांनी स्वागत केले. (वार्र्ताहर)पूर्णा नगरपालिकेच्या अध्यक्षपदी विशाल कदमपूर्णा : येथील नगरपालिकेच्या अध्यक्षपदी राकाँचे विशाल विजयकुमार कदम तर उपाध्यक्षपदी भारिप बहुजन महासंघाचे उत्तम मुगाजी खंदारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पालिकेच्या वाचनालयात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. उपजिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी गोविंद रणवीरकर व प्रभारी मुख्याधिकारी, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे विशाल कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड घोषित करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी भारिप बहुजन महासंघाचे उत्तम खंदारे व राष्ट्रवादीचे मधुकर मारोती गायकवाड असे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. परंतु अर्ज मागे घेण्याच्या वेळेत राष्ट्रवादीचे मधुकर गायकवाड यांनी माघार घेतल्यामुळे भारिपचे उत्तम खंदारे यांची निवड घोषित करण्यात आली. पूर्णा नगरपालिकेत राष्ट्रवादीचे बहुमत असून १० नगरसेवक आहेत. रिपाइं आघाडीचे ३, भारिप बहुजन महासंघ ३, शिवसेना २, बसपा १ असे पक्षीय समीकरण आहे. तत्कालीन नगराध्यक्षा लक्ष्मीबाई कदम यांच्यानंतर पाच वर्षांनी कदम कुटुंबातील विशाल कदम हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. राष्ट्रवादीचे बहुमत असताना उपाध्यक्षपदासाठी मधुकर गायकवाड यांनी मोर्चेबांधणी केली होती, परंतु राष्ट्रवादीचे काही नगरसेवक विरोधात जात आहेत हे पाहून त्यांनी माघार घेतल्याने उत्तम खंदारे यांची निवड झाली आहे. पूर्णा नगरपालिकेत भारिप बहुजन महासंघाचे केवळ ३ सदस्य असताना उत्तम खंदारे हे उपाध्यक्ष झाले. हे विशेष होय. या निवडीच्या वेळी पालिकेतील नंदू तावरे, उत्तम कांबळे, नगरसाळे, एंगडे, काळे, बोडखे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
सेलूच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे सुरेश कोरडे
By admin | Updated: July 12, 2014 01:11 IST