शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश गोसावी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू, राजभवनाकडून आदेश

By राम शिनगारे | Updated: December 28, 2023 20:10 IST

१ जानेवारी रोजी सकाळी स्वीकारणार पदभार

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मुदतीत पूर्णवेळ कुलगुरू मिळणार नसल्यामुळे पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात येणार आहे. याविषयीचे आदेश बुधवारी सायंकाळी विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी पूर्णवेळ कुलगुरूंची निवड होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पूर्णवेळ नवीन कुलगुरूंची निवड होईपर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२४ रोजी ते डॉ. प्रमोद येवले यांच्याकडून कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्याचवेळी अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पदभार डॉ. प्रमोद येवले यांच्याकडून कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्याकडे साेपविण्यात आला आहे. डॉ. येवले हे अमरावतीचा पदभार शुक्रवारी (दि. २९) रोजी सकाळी डॉ. माहेश्वरी यांच्याकडे सोपवणार असल्याची माहिती आहे.

'टॉप फाईव्ह'च्या ४ जानेवारीला मुलाखतीशोध समितीने शिफारस केलेल्या 'टॉप फाईव्ह'मधील पाच जणांच्या मुलाखती ४ जानेवारी २०२४ रोजी राजभवनात आयोजित केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याविषयीचे पत्र संबंधितांना प्राप्त झाले आहेत. त्यात पुणे विद्यापीठातील डॉ. विलास खरात, डॉ. संजय ढाेले, कोल्हापूरच्या विद्यापीठातील डॉ. ज्योती जाधव, डॉ. विजय फुलारी आणि नागपूर येथील डॉ. राजेंद्र काकडे यांचा समावेश आहे. यातील कोणता उमेदवार बाजी मारतो, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद