लोकमत न्यूज नेटवर्कबीड : माजी मंत्री सुरेश धस यांच्या भाजप प्रवेशाबद्दल पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. शनिवारी पालकमंत्री पंकजा मुंडे या बीड जिल्हा दौºयावर असून, आष्टी येथे दुपारी माजी मंत्री सुरेश धस यांच्या निवासस्थानी येणार आहेत.त्यांच्या या आगमनाप्रित्यर्थ सुरेश धस समर्थकांनी भव्य तयारी केली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि इतर संस्थांमध्ये असलेल्या त्यांच्या समर्थकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. जवळपास पाच हजार कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू असून धस यांच्या प्रवेशाची शक्यता आहे.
सुरेश धस यांच्या भाजप प्रवेशाबद्दल उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:59 IST