शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या निविदेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:12 IST

यशस्वी निविदाधारक निविदेच्या अटी व शर्ती पूर्ण करीत नसल्याने निविदा रद्द करावी व नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका अजयदीप कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लि. या कंपनीने खंडपीठात सादर केली होती.

ठळक मुद्देखंडपीठाच्या निकालात हस्तक्षेपास नकार

औरंगाबाद : केम्ब्रिज चौक ते महानुभाव आश्रम (बीड बायपास) रस्ता रुंदीकरणासाठी तसेच ४ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यासाठीची निविदा रद्द करण्याची विनंती करणारी याचिका खंडपीठाने फेटाळली होती. या निकालास आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. खंडपीठाने दिलेल्या निकालात हस्तक्षेप करण्यासाठी कोणताही सबळ मुद्दा दिसून येत नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. रोहिंटन नरिमन व न्या. नवीन सिन्हा यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली.

जागतिक बँक प्रकल्पांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा मागविल्या होत्या. जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर व मंजीत कॉटन प्रायव्हेट लिमिटेड या भागीदारीची निविदा सर्वांत कमी असल्याने स्वीकारण्यात आली होती. यशस्वी निविदाधारक निविदेच्या अटी व शर्ती पूर्ण करीत नसल्याने निविदा रद्द करावी व नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका अजयदीप कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लि. या कंपनीने खंडपीठात सादर केली होती. न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाने २४ सप्टेंबर २०२० रोजी सदर याचिका फेटाळली होती.

खंडपीठाच्या या निर्णयाविरुद्ध अजयदीप कन्स्ट्रक्शन यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका सादर केली होती. सदर याचिकेची सुनावणी १६ डिसेंबर २०२० रोजी झाली. सर्वोच्च न्यायालयासमोर अजयदीप कन्स्ट्रक्शन यांच्याकडून ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. अभिषेक मनू सिंघवी, ज्येष्ठ विधिज्ञ के. व्ही. विश्‍वनाथन, ॲड. महेश अग्रवाल यांनी, तर जीएनआय-मंजीत या भागीदारीसाठी ज्येष्ठ विधिज्ञ डी. एस. कामत, ॲड. देवदत्त पालोदकर आणि ॲड. शशिभूषण आडगावकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठHigh Courtउच्च न्यायालय