शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणावर निर्णय नाही; महापालिका निवडणूक लांबणार, इच्छुक हिरमुसले!

By मुजीब देवणीकर | Updated: January 29, 2025 19:55 IST

सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील नाही

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेची निवडणूक यंदा एप्रिल किंवा मे महिन्यात होईल, असा कयास लावण्यात येत होता. सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळाच्या दृष्टीने तयारीसुद्धा सुरू केली होती. मंगळवारी ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला ठेवली. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात मनपा निवडणूक होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.

एप्रिल २०२० मध्ये महापालिकेचा कार्यकाळ संपला. त्यानंतर शासनाने प्रशासकाची नेमणूक केली. पाच वर्षे उलटत आले तरी निवडणूक घेण्यात आलेली नाही. मागील पाच वर्षांत दोन वेळेस निवडणूक घेण्यासाठी हालचाली झाल्या. मनपा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार कामालाही लागले. २०२२ मध्ये तर पॅनेल पद्धतीने वॉर्डही तयार करण्यात आले. त्यानंतर पुन्हा निवडणुकीची चर्चा थांबली. महायुती सरकार सत्तेवर येताच पुन्हा निवडणुकीचे वेध लागले. राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागा अशा सूचना केल्या. इच्छुक उमेदवारांनी विधानसभा निवडणूक संपताच संभाव्य वॉर्डात कामाला सुरूवात केली. त्यातच सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासाठी सुनावणी घेण्यात आली. आज अंतिम निकाल येईल, यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष, कार्यकर्ते, इच्छुकांच्या नजरा न्यायालयाकडे खिळल्या होत्या. दुपारी पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला होणार, अशी तारीख घोषित झाली. त्यामुळे इच्छुकांनी पुन्हा तलवारी म्यान केल्या.

तीन किंवा चार वॉर्डांचा प्रभाग१) २५ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला तरी मार्च ते मे या तीन महिन्यांत तीन किंवा चार वॉर्डांचा एक प्रभाग तयार करणे, त्यावर सूचना हरकती मागविणे या प्रक्रियेला किमान अडीच ते तीन महिने लागतात.२) आचारसंहिता घोषित करून निवडणूक घेण्यासाठी वेळच मिळत नाही. मेअखेरीस पावसाळ्याला सुरूवात होते तेव्हा निवडणूक घेता येत नाही.३) विधानसभेला वापरण्यात आलेल्या अद्यावत मतदार याद्या महापालिका निवडणुकीसाठी वापराव्या लागतील. मतदार याद्या प्रभागानुसार तयार करण्यासाठीही वेळ लागतो.

९० दिवसांत प्रक्रिया अडचणीची२५ फेब्रुवारीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यासाठी आदेश दिले तरी ९० दिवसांत वॉर्ड रचना, सोडत, मतदार याद्या अद्यावत करणे आदी प्रक्रिया राबविणे अशक्यप्राय वाटते. त्यानंतरही निवडणूक आयोगाने आदेश दिले तर त्यादृष्टीने सर्व प्रक्रिया करण्यात येईल.- राहुल सुर्यवंशी, उपायुक्त, मनपा.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणElectionनिवडणूक 2024Muncipal Corporationनगर पालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर