शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खासदारकी सोडून जम्मू-काश्मीरला जावसं वाटतं - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 21:18 IST

खासदारकी सोडून सरळ जम्मू-काश्मीरला सहा महिने जावसं वाटतय. कारण, तेथील समस्या जाणून घेऊन त्यावर सर्वांनी प्रेमाने काही मार्ग काढू, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.

औरंगाबाद : खासदारकी सोडून सरळ जम्मू-काश्मीरला सहा महिने जावसं वाटतय. कारण, तेथील समस्या जाणून घेऊन त्यावर सर्वांनी प्रेमाने काही मार्ग काढू, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादमध्ये आयोजित मुप्टा संघटनेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'मला दोन गोष्टी करायची इच्छा होतेय. सोडून द्यावी ही खासदारकी. कपडे बांधावेत, पॅक करावेत आणि जम्मू काश्‍मिरला सहा महिने जाऊन रहावे. तिथल्या समस्या जाणून घेऊन त्यावर सर्वांनी प्रेमाने काही मार्ग काढू.' याचबरोबर, सत्ताधाऱ्यांवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'आमचे सत्तेतील लोक जम्मू-काश्मीरमधील आयांना सांगतात मुलांकडून बंदुक काढून घ्या. मला आश्‍चर्य वाटते या सत्तेतल्या लोकांचे. मला एक सांगा या देशातली नव्हे तर जगातली कुठली आई बंदुक घे म्हणून आपल्या मुलाला सांगते.' 

जम्मू-काश्मीरबाबत बोलताना मेघालयचे गर्व्हनर म्हणाले, काश्‍मिरी वस्तु विकत घेऊ नका. असे केले तर तुम्हाला चालेल का? औरंगाबादला दंगल झाली. मी आले अन्‌ म्हटले अरे बाबा नको ते औरंगाबाद. त्यांच्या वस्तु नको आपल्याला. हे फक्‍त भांडणेच करतात. म्हणजे आणखी मी तेल ओतणार. तुम्हाला दुखवून जाणार. का करायचे असे, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. 

पुलवामात सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. आम्ही वाट पाहत होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात का? मात्र, या दहशतवादी हल्ल्यानंतर, दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील आयोजित सभेला हजेरी लावली होती, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAurangabadऔरंगाबाद