लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिवसागणिक शेतकरी संपाची तीव्रता कमी होत असून, बाजारपेठेत फळ-पालेभाज्यांची आवक वाढत आहे. बुधवारी जाधववाडीतील अडत बाजारात १९४ टन फळभाज्यांची आवक झाली. शहरातील ठिकठिकाणच्या भाजीमंडईतही मुबलक प्रमाणात भाज्या उपलब्ध झाल्याने हळूहळू भाज्यांचे भाव उतरू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या संपाला बुधवारी सात दिवस पूर्ण होत असून, औरंगाबाद वगळता अन्य जिल्ह्यांत संपाचा जोर कायम आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात संपाची तीव्रता जाणवत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे केंद्र आता नाशिक बनले आहे. मात्र, बुधवारी नाशिक जिल्ह्यातून औरंगाबादेत फुलकोबी, पत्ताकोबी, सिमला मिरची, बिन्स, गाजराची आवक (पान २ वर)
जाधववाडीत १९४ टन फळभाज्यांचा पुरवठा
By admin | Updated: June 8, 2017 00:40 IST