शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

औरंगाबाद येथील उच्च शिक्षण सहसंचालकांची सोलापूरला बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:34 IST

उच्च शिक्षण विभागाच्या औरंगाबाद येथील सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर यांची सोलापूर येथे सहसंचालक म्हणून बदली झाली आहे. तर सोलापूरचे सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांची बदली

औरंगाबाद : उच्च शिक्षण विभागाच्या औरंगाबाद येथील सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर यांची सोलापूर येथे सहसंचालक म्हणून बदली झाली आहे. तर सोलापूरचे सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांची बदली  औरंगाबादला झाली. या फेरबदलाचा शासन निर्णय निघाला आहे. 

औरंगाबादच्या उच्च शिक्षण सहसंचालकपदाचा पदभार डॉ. राजेंद्र धामणस्कर यांनी १० डिसेंबर २०१५ रोजी घेतला होता. तत्कालिन सहसंचालक डॉ. मगर यांनी संघटनांच्या आरेरावीला कंटाळून पदाचा राजीनामा देत मुळ ठिकाणी रूजु होण्यास प्राधान्य दिले. यानंतर आलेल्या डॉ. धामणस्कर यांनाही संघटनांनी हैराण करण्याचा प्रयत्न केला. या परिस्थितीतही त्यांनी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ याठिकाण काम केले. मात्र मंत्रालयात झालेल्या घडामोडींमुळे त्यांचा पदभार औरंगाबादेतुनच सोलापूरला गेलेले डॉ. सतीश देशपांडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. धामणस्कर यांची बदली होऊन त्याठिकाणी आपल्याला प्रभारी पदभार मिळावा यासाठी पुर्वाश्रमीच्या प्रभारी सहसंचालकांनी मराठवाड्यातील एका मंत्र्यामार्फत जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. उलट औरंगाबादसाठी पाण्यात देव घालुन बसलेले डॉ. सतीश देशपांडे यांनी बाजी मारली. सोलापूरला केवळ एकच जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आहे. औरंगाबादच्या कार्यक्षेत्रात चार जिल्ह्यांचा समावेश होतो. तसेच प्रकरणांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे डॉ. देशपांडे यांनीही उच्चस्तरीय सूत्रे हालवत पसंतीच्या ठिकाणी बदली करुन घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.  दरम्यान, उच्च शिक्षण संचालकांकडून बदली आदेश आल्यानंतरच डॉ. धामणस्कर हे पदभार सोडण्याची शक्यता आहे. 

प्रीआयएएस सेंटरला संचालक प्रभारीच राहणार

औरंगाबादेतील प्रीआयएएस कोचिंग सेंटरचा प्रभारी पदभार नागपूर येथील वसंतराव नाईक शासकीय कला महाविद्यालयात कार्यरत असलेले डॉ. बळीराम लहाने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हा पदभार डॉ. एस. जी. गुप्ता यांच्याकडे होता. याविषयी डॉ. लहाणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सोमवारी पदभार स्विकारणार असल्याचे सांगितले.