शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुपर! छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी नवी रेल्वे, ‘जनशताब्दी’आधी धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

By संतोष हिरेमठ | Updated: December 23, 2023 12:12 IST

जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस : प्रस्तावित वेळापत्रक आले समाेर, रेल्वे प्रवाशांना नववर्षाची भेट

छत्रपती संभाजीनगर : मुंबईसाठी छत्रपती संभाजीनगरहून पूर्वीप्रमाणे पहाटे ६:०० वाजता नव्या रेल्वेची गरज अखेर पूर्ण होणार आहे. जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे प्रस्तावित वेळापत्रक समोर आले आहे. यानुसार छत्रपती संभाजीनगरहून ही रेल्वे सकाळी ५:५५ वाजता मुंबईसाठी रवाना होणार आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्याच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन वर्षभरापासून दुर्लक्ष करीत आहे. या रेल्वेची वेळ बदलता येत नसेल तर ‘जनशताब्दी’आधी छत्रपती संभाजीनगरहून पहाटे मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू केली पाहिजे, असे आग्रही मत ९५ टक्के प्रवाशांनी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात मांडले. यासंदर्भात ६ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’ने ‘जनशताब्दीच्या आधी पहाटे मुंबईसाठी हवी नवी रेल्वे’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. अखेर ही मागणी वंदे भारत एक्स्प्रेसच्या रुपाने लवकरच पूर्णत्त्वास जाणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसची प्रस्तावित वेळ- जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस : जालन्यावरून पहाटे ५:०५ वाजता सुटेल. छत्रपती संभाजीनगरला सकाळी ५:५३ वाजता येईल आणि ५.:५५ वाजता पुढे रवाना होईल. दुपारी ११:५५ वाजा मुंबईत (सीएसएमटी) पोहोचेल.- मुंबई - जालना वंदे भारत एक्स्प्रेस : मुंबईहून (सीएसएमटी) दुपारी १:१० वाजता सुटेल. छत्रपती संभाजीनगरला सायंकाळी ७:०८ येईल आणि ७:१० वाजता रवाना होईल. जालना येथे रात्री ८:३० वाजता पोहोचेल.- ही रेल्वे जालना, छत्रपती संभाजीनगर, अंकाई, मनमाड, नाशिक, इगतपुरी, ठाणे, सीएसएमटी येथे थांबेल.

गती ताशी ६४ कि.मी.जालना ते मनमाड या १७४ कि. मी. मार्गावर रेल्वेची गती ताशी १३० कि. मी.पर्यंत वाढविण्यास मार्चमध्ये परवानगी मिळाली. या मार्गावरील विद्युतीकरणाचेही काम पूर्ण झाले आहे. प्रस्तावित वंदे भारत एक्स्प्रेसची गती ही मुंबईकडे जाताना ताशी ६४ कि. मी. आणि मुंबईहून परत येताना ५९ कि. मी. राहणार असल्याचे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.

परतीची वेळ बदलावीरेल्वे अभ्यासक स्वानंद सोळंके म्हणाले, मुंबईहून परतीच्या वेळेत ही रेल्वे दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास निघाली पाहिजे. त्यातून मुंबईत कार्यालयीन कामकाज आटोपून परत येणाऱ्यांची सोय होईल. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले, वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, वर्षअखेरीस उद्घाटन होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासीMumbaiमुंबईJalanaजालना