शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सुनील केंद्रेकर विभागीय आयुक्तपदी; सेवानिवृत्तीला २० दिवस राहिलेले असतानाच भापकरांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 18:59 IST

सुनील केंद्रेकर हे नवे विभागीय आयुक्त असतील. 

औरंगाबाद : विद्यमान विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या सेवानिवृत्तीला २० दिवस राहिलेले असतानाच त्यांची पुणे येथे क्रीडा आयुक्त पदावर शुक्रवारी शासनाने बदली केली. सुनील केंद्रेकर हे नवे विभागीय आयुक्त असतील. 

सेवानिवृत्तीची तारीख जवळ आल्यामुळे भापकर पदभार सोडणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. केंद्रेकर केव्हा रुजू होणार, याबाबत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. इकडे डॉ.भापकर यांच्याशीही संपर्क झाला नाही. मात्र बदली झाल्याची आॅर्डर विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त झाल्याची माहिती आहे. 

गेल्या वर्षी ३ फेबु्रवारी २०१८ मध्ये शासनाने डॉ.भापकरांची पशुसंवर्धन खात्यात सचिवपदी बदली करून  केंद्रेकर यांची विभागीय आयुक्तपदी बदली केली होती. ४ फेबु्रवारी रोजी त्यांची बदली रद्द झाली होती. वर्ग-२ जमिनीच्या प्रकरणातून भापकर यांच्यावर तत्कालीन उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी १ कोटी रुपये मागितल्याची व अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार केली होती. त्या प्रकरणातून बदली झाल्याची चर्चा होई. त्यामुळे पूर्ण क्षमतेने भापकरांनी बदली रोखण्यात यश मिळविले होते. त्यावेळीही केंद्रेकर रुजू होण्याच्या तयारीत असताना त्यांची बदली रद्द करण्यात आली होती. 

१ जानेवारी २०१७ रोजी डॉ.भापकर यांनी आयुक्तपदाची सूत्रे घेतली होती. निवृत्तीपूर्वी ऐच्छिक ठिकाणी बदलून जाण्याची मुभा शासनाकडून मिळते. त्यानुसार डॉ.भापकर आयुक्तपदी बदलून आले होते. आता त्यांना सेवेतून निवृत्त होण्यासाठी २० दिवस राहिलेले असताना त्यांची बदली झाली.

केंद्रेकरांची औरंगाबादेत सेवा केंद्रेकर यांनी औरंगाबादेत विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची कृषी आयुक्त पुणे या पदावर बदली झाली. नंतर क्रीडा विभागात बदली झाली. दोन वर्षांत विभागीय आयुक्तपदी बदली होण्याचा प्रकार त्यांच्या बाबतीत घडला आहे. 

लोकसभेसाठी भापकरांचे नाव डॉ.भापकर लोकसभा निवडणूक लढविण्याची चर्चा दीड वर्षापासून सुरू आहे. त्या चर्चेला बदलीमुळे पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. भाजप किंवा काँग्रेसकडून उमेदवार म्हणून भापकर यांचे नाव चर्चेत येत राहिले. 

टॅग्स :Dr Purushottam Bhapkarडॉ पुरुषोत्तम भापकरMarathwadaमराठवाडाTransferबदली