शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
2
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
3
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
4
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
5
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
6
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
7
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी भेटणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
8
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
9
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
10
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
11
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
12
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
13
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
14
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
15
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
16
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
17
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
18
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
19
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
20
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला

रविवार ‘ब्लॅक डे’ ठरला

By admin | Updated: May 16, 2016 00:21 IST

औरंगाबाद : शहरात उन्हाचा पारा ४२ अंश सेल्शिअसवर गेल्याने रविवारी दुपारी घराबाहेर पडण्यापूर्वी औरंगाबादकर दहा वेळेस विचार करीत होते.

औरंगाबाद : शहरात उन्हाचा पारा ४२ अंश सेल्शिअसवर गेल्याने रविवारी दुपारी घराबाहेर पडण्यापूर्वी औरंगाबादकर दहा वेळेस विचार करीत होते. ‘वाढलेल्या पाऱ्याचा’ सर्वाधिक फटका रविवारच्या आठवडी बाजाराला बसला. ग्राहकांनी तर पाठ फिरविलीच. विक्रेत्यांनाही भरदुपारी आपला गाशा गुंडाळावा लागला.गरिबांचा ‘निराला’ बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाफरगेट येथील आठवडी बाजारात आज वर्दळ अजिबात नव्हती. उन्हाचा पारा चढल्याने दुपारी तुरळक प्रमाणात ग्राहक बाजारात आल्याचे दिसून आले. इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, हार्डवेअर विक्रेत्यांनी दुपारी ४ वाजेनंतर गाशा गुंडाळणे सुरू केले. आजचा रविवार आमच्यासाठी ‘ब्लॅक डे’ ठरला, असे काही विक्रेत्यांनी सांगितले. सेकंड हँड टीव्ही विक्रेत्यांची बोहणीसुद्धा झाली नव्हती. रस्ते निर्मनुष्य; पारा उतरेनाऔरंगाबाद : मे महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा पारा हळूहळू वाढत आहे. उन्हाच्या पाऱ्याने मेच्या सुरुवातीलाच चाळिशी ओलांडली. तरीही तापमान आतापर्यंत चाळीस अंश सेल्शिअसच्या आसपासच होते. रविवारी शहराचे तापमान ४२.४ अंश सेल्शिअसपर्यंत पोहोचले. वाढत्या तापमानाचा परिणाम दैनंदिन व्यवहारांवर दिसून येत आहे. उन्हाच्या तप्त झळा सहन होत नसल्यामुळे नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे दुपारी १ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान शहरातील रस्ते सुनसान दिसत आहेत. नेहमी वर्दळीच्या क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा, कॅनॉट गार्डन, सिडको, हडको भागांत रविवारी वाहनांसह नागरिकांची वर्दळ घटली होती. असह्य उन्हामुळे नागरिकांनी घरात राहणे पसंत केले. उन्हामुळे बाजारपेठेतील गर्दीही कमी झाली आहे. उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की, दुपारच्या वेळी ठिकठिकाणी रस्त्यांवरील डांबर वितळल्याचे दिसून येत होते.