शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या मृत्यूबाबत स्युमोटो याचिका : ‘लोकमत’मधील वृत्ताची खंडपीठाने स्वत:हून घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 18:47 IST

बेशुद्ध केल्यानंतर बिबट्याचा झाला होता मृत्यू

ठळक मुद्देखंडपीठाच्या महापालिकेलाही सूचना

औरंगाबाद : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यानेच पैठण तालुक्यातील थेरगाव शिवारात बिबट्याचामृत्यू झाला. बेशुद्ध केल्यानंतर कुठलीच काळजी न घेतल्याने त्याचे हृदय बंद पडले. शवविच्छेदन केल्यामुळे ही बाब समोर आल्याचे वृत्त लोकमतने बुधवारी १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध केले होते.

बुधवारी खंडपीठात झालेल्या तातडीच्या प्रकरणांवर सुनावणीदरम्यान खंडपीठाने स्वत:हून लोकमतच्या या वृत्ताची दखल घेऊन या वृत्ताला स्युमोटो जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले. न्यायालयाचे मित्र अमिकस क्युरी म्हणून अ‍ॅड. चैतन्य धारूरकर यांची खंडपीठाने नेमणूक केली अ‍ॅड. धारूरकर यांनी २७ एप्रिल पूर्वी जनहित याचिका तयार करून खंडपीठात सादर करावी यासाठी त्यांनी ही बातमी लिहिणारे लोकमतचे वार्ताहर यांचे सहकार्य घ्यावे, असेही आदेशात म्हटले आहे.

औरंगाबाद येथे महापालिकेचे प्राणिसंग्रहालय आणि शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय आहे त्यांच्याकडील पशुवैद्यकीय डॉक्टरांचे बिबट्याच्यामृत्यूच्या कारणाबाबत माहिती घेण्यासाठी सहकार्य घेता येईल म्हणून त्यांना प्रतिवादी करण्याची मुभा खंडपीठाने अ‍ॅड.  धारूरकर यांना दिली आहे. खंडपीठाने महापालिकेच्या आयुक्तांना निर्देश दिले आहे. की, त्यांनी बिबट्याच्या मृत्यूसंदर्भातील सर्व कागदपत्रे, छायाचित्रे आणि पोस्टमार्टेम रिपोर्ट आदी कागदपत्रे मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांच्याकडून त्वरित ताब्यात घ्यावीत. त्याचे दोन संच तयार करून १६ एप्रिलच्या दुपारी तीन वाजेपर्यंत उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांकडे बंद पाकिटात दाखल करावेत. हे पाकीट महापालिकेने नियुक्त केलेल्या अधिका-यांमार्फत पाठवावे. प्रबंधकांनी त्या अधिका-याच्या उपस्थितीत बंद पाकीट उघडून त्यातील दोन संचांची मूळ संचासोबत पडताळणी करावी. रात्रीनंतर प्रबंधकांनी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत बंद पाकिटात मूळ संच मनपा आयुक्तांना परत करावा. त्यातील एक संच त्यांनी अ‍ॅड.  धारूरकर यांना जनहित याचिका तयार करण्यासाठी द्यावा व दुसरा जतन करून ठेवावा.महापालिकेतर्फे वडगाव येथील प्रस्तावित प्राण्यांच्या स्मशानभूमीबाबत अ‍ॅड. धारूरकर यांना माहिती द्यावी, असे आदेशात म्हटले आहे. महापालिकेतर्फे अ‍ॅड. संतोष चपळगावकर  तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे काम पाहत आहेत. 

टॅग्स :leopardबिबट्याAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठforest departmentवनविभागDeathमृत्यू