शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; तरुणी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 20:23 IST

मानसिक त्रास देऊन आर्थिक लुबाडणूक करीत असल्याने त्रस्त झालेल्या पैठण शहरातील २४ वर्षीय तरूणाने बुधवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पैठण : प्रेयसी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याच्या धमक्या देत सातत्याने मानसिक त्रास देऊन आर्थिक लुबाडणूक करीत असल्याने त्रस्त झालेल्या पैठण शहरातील २४ वर्षीय तरूणाने बुधवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित प्रेयसीवर गुन्हा दाखल करून तीला अटक केली आहे. कृष्णा पुंजाराम खुटेकर  रा. नारळा पैठण असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. 

आज सकाळी कृष्णा खुटेकर या तरूणाने खीशात चिठ्ठी लिहून राहत्या घरात केबल वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस पंचनामा करताना मयत कृष्णाच्या खीशात लिहलेली चिठ्ठी सापडली या चिठ्ठीत  मयत कृष्णा याने प्रेयसीचे नाव टाकून ती मला खुप त्रास देत आहे.मला काही काही धमक्या देत आहे , मी खुप मानसिक तणावात जावुन हे पाऊल उचलत आहे. तरी, माझी काहीच चुक नाही. मला न्याय देण्यात यावा असे लिहून ईंग्रजीत सही केलेली आहे.या प्रकरणी मयत कृष्णाच्या आईने संबंधित प्रेयसी मुलास नेहमी पैसे मागत होती व त्रास देत असल्याचे सांगितले. या प्रकरणी मयत कृष्णाच्या काका शिवाजी भाऊराव इंगळे वय ४५ वर्ष व्यवसाय मजुरी रा.नारळा पैठण यांनी कृष्णाच्या प्रेयसी विरोधात पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रेयसीला अटक केली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख बामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे हे करत आहेत.