शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलाची वैजापुरात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:45 IST

मुलीला लग्नासाठी स्थळ येत असल्याने प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना वैजापूर तालुक्यातील खंबाळा शिवारात मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

वैजापूर : मुलीला लग्नासाठी स्थळ येत असल्याने प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना वैजापूर तालुक्यातील खंबाळा शिवारात मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.सागर राहुल म्हैसमाळे (२२) व साक्षी बाबासाहेब शेजवळ (१८), अशी त्यांची नावे असून, ते दोघेही जांबरगावचे रहिवासी होते. साक्षी ही विनायकराव पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती व सागर हा चप्पल विक्रीचा व्यवसाय करीत होता. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता; पण घरच्यांकडून या लग्नाबाबत चालढकल होत होती. त्यातच साक्षीला पाहण्यासाठी स्थळ येत असल्याने आपले लग्न होणार का, याबाबत प्रेमीयुगुल चिंतातुर होते. साक्षीला तिच्या वडिलांनी सोमवारी दुपारी कॉलेजमधून घरी आणले. मात्र, त्यानंतर ती बेपत्ता झाली. घरच्यांनी शोध घेतला; पण ती सापडली नाही. मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास लाडगाव रस्त्यावर रोठी वस्तीजवळच्या खंबाळा शिवारातील लिंबाच्या झाडाला एकाच ओढणीने गळफास घेतलेले दोघांचे मृतदेह आढळून आले.याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रामहरी जाधव, गुणवंत थोरात, पोलीस नाईक संजय घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलीस पाटील अर्जुन साठे यांनी दिलेल्या माहितीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार एस.के. धादवड हे करीत आहेत.तरुण वर्गात खळबळस्वामी समर्थनगर भागात राहणारी मयुरी अशोकराव चव्हाण (२१) या तरुणीने पाच दिवसांपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना मंगळवारी खंबाळा शिवारात पुन्हा प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याने तरुण वर्गात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही तरुणी वैजापूर शहरातील एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. या दोन्ही घटनांत गळफास घेताना ओढणीचा वापर करण्यात आल्याने नेमका प्रकार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Policeपोलिस