शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या त्रासाला कंटाळून वृद्धेचा रेल्वेरुळावर आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 19:11 IST

सन्मानाने वागविण्याची मुलाकडूृन पोलिसांनी घेतली हमी

ठळक मुद्दे मुलगा जिवे मारण्याची धमकी देतो आणि घरातील वातावरण खराब झाल्याने टोकाचे पाऊल उचले

औरंगाबाद : बेरोजगारीमुळे दारूचे व्यसन लागलेल्या मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळावर बसलेल्या वृद्धेला वाचविण्यात सामाजिक कार्यकर्त्यांना सोमवारी सकाळी यश आले. ही घटना संग्रामनगर रेल्वे रूळ परिसरात घडली.सुलभा लक्ष्मीकांत कुलकर्णी (५५, रा. सातारा परिसर), असे या महिलेचे नाव आहे.  सुलभा यांचे पती खाजगी नोकरीनिमित्त नांदेड येथे राहतात. त्यांना दोन मुले आहेत. खाजगी नोकरी गेल्याने त्यांचा मोठा मुलगा गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार आहे. पतीकडून मिळणाºया पैशातून सुलभा घर चालवितात.

 त्यांच्या मोठ्या मुलाला दारूचे व्यसन जडले आहे. दारूच्या नशेत तो सुलभा यांच्यासह घरातील अन्य सदस्यांना सतत शिवीगाळ आणि मारहाण करतो. दारूसाठी पैसे मागतो. चार दिवसांपूर्वी त्याने घरात लाकडी दांडा आणून ठेवला असून, तो आईला जिवे मारण्याची धमकी देत असतो. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या सुलभा यांनी मुलाच्या हातून मरण्यापेक्षा आपण आत्महत्या करावी, असा विचार करून त्या सोमवारी सकाळी थेट संग्रामनगर परिसरातील रेल्वे रुळावर येऊन बसल्या. सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील, सुरेश दाभाडे, कैलास भातपुडे, शिवानंद वाडकर यांनी तेथे धाव घेऊन त्यांना रेल्वे रुळावरून उठण्याची विनंती केली. मला जगायचे नाही, असे म्हणून त्या रेल्वेचा सेफ्टी खांब घट्ट पकडून बसल्या. शेवटी गोर्डे पाटील यांनी नंदा सोंजे, नेत्रा जोशी, मीना कीर्तीकर, पद्मा तोंबडकर यांना बोलावले. या महिलांनी त्यांना रुळावरून उठण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्या ऐकत नव्हत्या. त्याचवेळी रेल्वे इंजिन येत असल्याचे त्यांना दिसले. इंजिन २०० मीटरवर आले तरी सुलभा रुळावरून उठत नसल्याने शेवटी महिलांनी त्यांना बळजबरीने उचलून बाजूला केले. त्यांनी मुलगा जिवे मारण्याची धमकी देतो आणि घरातील वातावरण खराब झाल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले.

नातेवाईकांना बोलावलेसातारा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. तेथे त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांना जेवायला दिल्यानंतर सातारा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी सुलभा यांचा मुलगा, सून आणि अन्य नातेवाईकांना बोलावून घेतले. पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे, सपोनि सुनील कराळे, कर्मचारी कारभारी नलावडे यांनी मुलाला समजावून  सांगितल्यानंतर आईला सन्मानाची वागणूक देण्याच्या हमीवर त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले.