शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड कामगार महिलांची गर्भपिशवी काढण्याचे वाढते प्रकार, 'आरोग्य मित्र' संकल्पना राबवणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:21 IST

रूपाली चाकणकरांची माहिती, बालविवाह रोखण्यास प्राधान्य

छत्रपती संभाजीनगर/बीड : महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी, तसेच त्यांना तक्रारी दाखल करण्यासाठी योग्य मंच देण्याकरिता महिला आयोग कायम आपल्यासोबत आहे. ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 'आरोग्य मित्र' उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मंगळवारी दिला. 

ऊसतोड महिलांची गर्भपिशवी काढण्याच्या प्रकाराबाबत चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली. महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही रूपाली चाकणकर यांनी सांगितले. ऊसतोड कामगार महिलांची गर्भपिशवी काढणे, आरोग्य समस्या,बालविवाह याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. यावेळी आयोगाच्या उपसचिव डॉ. पद्मश्री वैनाडे, विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, बीड जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. विभागीय महिला व बालविकास उपायुक्त रेश्मा चिमंद्रे यांनी विभागातील महिलांविषयक उपक्रमाबाबत माहिती दिली. सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यांची महत्त्वाची भूमिका असून, नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बालविवाह आदी 'कु'प्रथा रोखण्यासाठी संकल्प करावा, असे आवाहन केले.

लोकमत'च्या वृत्तांची दखलबीड जिल्ह्यात २०१९ पूर्वी ५७६ आणि नंतर २६७ ऊसतोड महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर १६ जून रोजी जिल्ह्यातील बालविवाहाचा मुद्दाही चव्हाट्यावर आणला होता. या दोन्ही संवेदनशील वृत्तांची दखल घेत महिला आयोगाने दखल घेत तातडीचे बैठक घेतली. त्यात बालविवाह, गर्भलिंग निदान चाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्या आदींबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगत बालविवाह रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला.

जॉन्सन यांची संकल्पनाबीडसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत ऊसतोड महिला कामगार स्थलांतर करतात. त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत. यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संकल्पनेतून यावर्षी 'आरोग्य मित्र' उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांसाठी त्याच समूहातील एकाची आरोग्य मित्र म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. आरोग्य मित्र आरोग्याच्या समस्यांबाबत आशासेविका, अंगणवाडी सेविकांच्या संपर्कात असेल.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेWomenमहिलाBeedबीड