शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

वाशी पाेलीस ठाण्याच्या आवारात अचानक स्फाेट; दुकानांसह घरांच्या भिंतीला तडे गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 19:20 IST

पाेलिस ठाण्याच्या आवारातील रिकाम्या जागेत झालेल्या स्फाेटाची तीव्रता प्रचंड हाेती.

वाशी (जि. धाराशिव) : येथील पाेलिस ठाण्याच्या आवारात साधारणपणे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक स्फाेट झाला. हा आवाज एवढा माेठा हाेता की, परिसरातील घरे, दुकानांच्या खिडकीच्या काचा फुटल्या. तसेच भिंतींना तडे गेले आहेत. दरम्यान, कशाचा स्फाेट झाला? याचा तपास घेण्यासाठी बाॅम्बशाेधक पथकास पाचारण केले आहे.

वाशी पाेलीस ठाण्याच्या पूर्वेकडील भागात जगदाळे काॅम्प्लेक्स आहे. पूर्वी या ठिकाणी पाेलिस कर्मचाऱ्यांची वसाहत हाेती. काही दिवसांपूर्वीच ती जमीनदोस्त करण्यात आली हाेती. पाेलिस यंत्रणेच्या या खुल्या जागेला लागूनच जगदाळे यांच्या मालकीचे पत्र्याचे शेड आहे. या ठिकाणी विविध दुकाने आहेत तर बाजूलाच पक्की घरे आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास याच जागेत अचानक स्फोट झाला. ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. स्फोटाची तीव्रता माेठी असल्याने शेजारील मोबाईल दुकानातील स्क्रीन, ग्राहक सेवा केंद्रातील काचेच्या टेबलासह अन्य साहित्य फुटले आहे. एवढेच नाही तर घरांचे लाकडी दरवाजे तुटले असून भिंतींना तडे गेले आहेत. साधारणपणे १ हजार मीटर अंतरातील घरांसह दुकानांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, हा स्फाेट कशाचा हाेता? याचा तपास घेण्यासाठी बाॅम्बशाेधक तसेच श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे. या स्फाेटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

काच फुटून महिलेच्या डाेळ्यास लागलीपाेलिस ठाण्याच्या आवारातील रिकाम्या जागेत झालेल्या स्फाेटाची तीव्रता प्रचंड हाेती. या स्फाेटामुळे ग्राहक सेवा केंद्राच्या खिडकीची काच फुटून आतमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या डाेळ्यावर लागली.

बाॅॅॅम्बशाेधक, निकामी पथक स्पॉटवरपाेलिस ठाण्याच्या परिसरात झालेल्या स्फाेटाची कल्पना तातडीने वरिष्ठांना देण्यात आली तसेच स्फाेटाच्या तपासकामी बाॅम्बशाेधक व निकामी पथक तसेच श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे. या पथकाच्या अहवालानंतरच कशाचा स्फाेट झाला, हे सांगता येईल.-संग्राम थाेरात, पाेलिस निरीक्षक, वाशी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdharashivधाराशिव