शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अशी संधी पुन्हा येणार नाही, मराठा म्हणून एकजूट राहा; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

By बापू सोळुंके | Updated: October 11, 2023 11:49 IST

आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील पाच कोटी मराठे ओबीसीमध्ये आले तर आमचे आरक्षण कमी होईल, अशी भीती ओबीसी समाजाला दाखविण्यात येत आहे. पाच कोटी मराठ्यांपैकी विदर्भ, खान्देश, कोकणपट्टा, शेवगावपासून ते पाथर्डीपर्यंतचा सुमारे साडेतीन कोटी मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसीमध्ये आहेच. उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठ्यांनी तुमचे काय घोडे मारले, असा सवाल करीत मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, फक्त मराठा समाजाने एकजुटीने राहावे, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल येथे मंगळवारी रात्री आयोजित जाहीर संवाद सभेत ते बोलत होते. नियोजित वेळेच्या तीन तास उशिरा सुरू झालेल्या सभेसाठी शहर आणि ग्रामीण भागातील मराठा बांधवांनी विभागीय क्रीडा संकुलावर गर्दी केली होती. जरांगे पाटील यांचे ८ वाजता आगमन होताच ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणांनी क्रीडा संकुल दणाणले. जरांगे म्हणाले की, २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. शांततेने उपोषण करणाऱ्या माता-भगिनींवर पोलिसांनी प्राणघातक हल्ला केला. एवढेच नव्हे तर आमच्यावरच कलम ३०७, १२० सारखे गुन्हे नोंदविले. या घटनेनंतर मराठा समाज एकवटला आणि सरकारने आरक्षण देण्याची तयारी दाखवित आपल्याला एक महिन्याची मुदत मागितली. आपणही मराठा समाजबांधवांशी सल्लामसलत करून ४० दिवसांची मुदत दिली. ही मुदत २४ ऑक्टोबरला संपत आहे. तत्पूर्वी आपल्याला १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे सभा घेऊन सरकारला ताकद दाखवायची आहे. सुरुवातीला किशोर चव्हाण यांनी जरांगे यांच्या रुपाने सच्चा कार्यकर्ता समाजाला लाभल्याचे नमूद केले. विजय काकडे आणि सुनील कोटकर यांनी सूत्रसंचालन केले.

छगन भुजबळांवर टीका नाहीमराठा आरक्षणाला विरोध करीत असल्यामुळे मी त्या मंत्र्यांवर टीका केली. आमच्याच हक्काचे आरक्षण खायचे आणि पुन्हा त्यावर मालकी सांगायचे हे चालणार नाही, अशा शब्दात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. त्यांनी आता आरक्षणाला पाठिंबा दिल्याचे सांगितले. यामुळे मीपण त्यांच्यावर टीका करणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

तीन ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था, यामुळे वाहतूक कोंडी टळलीसभेसाठी आलेले सर्व मराठा बांधव आणि भगिनी सायंकाळी ५ ते ८ पर्यंत सभास्थळी बसून जरांगे यांची प्रतीक्षा करीत होते.मनोज जरांगे पाटील सभास्थळी येताच उपस्थितांनी उभे राहून आणि मोबाइल बॅटरी चमकावून त्यांचे स्वागत केले.सभेसाठी एसीपी रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, पोलिस निरीक्षक सुशील जुमडे यांच्यासह पाच पोलिस निरीक्षक आणि ३० एपीआय, पीएसआय, १२७ पोलिस, २३ महिला पोलिस आणि दोन आरसीपीच्या तुकड्या तैनात. विविध मराठा कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि फरसाणचे वाटप केले.बाहेरगावाहून आलेल्या मराठा बांधवांसाठी आयोजकांनी भोजनाची व्यवस्था केली होती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद