शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी संघटनांच्या रेट्याला यश, शिष्यवृत्तीमधील ‘राईट टू गिव्ह अप’ ऑप्शन केले बाजूला

By विजय सरवदे | Updated: February 8, 2024 18:50 IST

१५ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदत

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थी संघटनांच्या दबावामुळे समाज कल्याण विभागाने महाडीबीटी पोर्टलवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लॉगीनवर असलेले ‘राईट टू गिव्ह अप’ हे ऑप्शन बटन अखेर बाजूला केले. अनावधानाने या बटनवर क्लिक करणाऱ्या विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती नाकारली आहे, असा याचा अर्थ होता. आता हे बटनच फॉर्मवरून बाजूला केल्यामुळे हजारो शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

सध्या महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत २२ हजार ७४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले नाहीत. यंदा ११ ऑक्टोबरपासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांच्या लॉगीनवर अर्ज भरताना पहिल्यांदाच ‘राईट टू गिव्ह अप’ हे ऑप्शन बटन देण्यात आले आहे. यावर क्लिक केल्यास काय परिणाम होतील, याची माहिती विद्यार्थ्यांसह सायबर कॅफे चालकांना देखील नाही. विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये ‘माय अप्लाइड स्कीम’ पानावर ‘राईट टू गिव्ह अप’ हे ऑप्शन आहे. भरलेल्या अर्जामध्ये विद्यार्थ्यांना दुरुस्ती करायची असेल, तर ‘माय अप्लाइड स्कीम’ येथे जाऊन विद्यार्थ्याला परत रिअप्लाय करावे लागते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी रिअप्लाय ऐवजी चुकून ‘राईट टू गिव्ह अप’ यावर क्लिक केल्यास त्याची शिष्यवृत्ती बंद करण्यात येते. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मराठवाडा कार्याध्यक्ष संतोष अंभोरे, परिवर्तन चळवळीचे राहुल मकासरे यांनी समाज कल्याण विभागास निवेदन देऊन ते ऑप्शन हटविण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच ‘माय अप्लाइड स्कीम’ पेजवरील ते बटन दुसऱ्या ठिकाणी हटविण्यात आले.

बँक खाते ‘आधार’शी जोडासमाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी. जी. वाबळे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक आहे. ज्यांनी आधार कार्ड लिंक केले नाही, त्यांचा निर्वाह भत्ता, शिक्षण व परीक्षा शुल्कापोटी शिष्यवृत्तीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा होणार नाही. विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत, तर महाविद्यालयांनी आपल्या लॉगीनवर प्राप्त विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज समाज कल्याण विभागाकडे फॉरवर्ड करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादScholarshipशिष्यवृत्तीEducationशिक्षण