शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो, पाहा इतका आहे प्राध्यापकांचा पगार; त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 19:23 IST

व्यवस्थापन व प्राध्यापकांमधील वाद विकोपाला

ठळक मुद्देबदनापूर महाविद्यालयात प्राचार्यांनी लावले होर्डिंग्ज विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे मत

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या पगारांचे आकडे असलेले होर्डिंग्ज प्रत्येक विभागाच्या बाहेर लावण्यात आले आहेत. या पगारपत्रकाच्या खाली ‘विद्यार्थ्यांनी सदरील शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा,’ असेही लिहिण्यात आले. त्यामुळे या होर्डिंग्जची विद्यार्थी, पालकांमध्येही खमंग चर्चा करण्यात येत आहे. प्राध्यापकांसोबतच्या टोकाच्या वादामुळे हा  मार्ग संस्थाचालकाने पत्कारल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक तासिका घेत नाहीत. एक लाखाच्या घरात प्राध्यापकांचे पगार गेलेले असताना तासिका घेण्यात येत नसल्याबद्दल अनेक ठिकाणी नाराजीचा सूरही दिसून येतो. त्यातच बदनापूर येथील महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य आणि प्राध्यापकांतील वाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सर्वश्रुत आहे. या महाविद्यालयातील चार प्राध्यापकांना निलंबित केलेले आहे. याविरोधात ‘बामुक्टो’सह इतर प्राध्यापक संघटनांनी आंदोलनेही केलेली आहेत. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी प्राचार्या आणि व्यवस्थापनाविरोधात विद्यापीठाचे कुलगुरू, उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक यांच्याकडे अनेक तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने संबंधित महाविद्यालयातील प्राध्यापकांचे पगार विद्यापीठामार्फत करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयानंतर संस्थाचालक आणि प्राध्यापकांमधील मतभेद विकोपाला गेले आहेत. यातूनच व्यवस्थापनाने महाविद्यालयातील प्रत्येक विभागाच्या बाहेर कार्यरत प्राध्यापक आणि त्यांचे पगाराचे आकडे मोठ्या व ठळक अक्षरात असलेले होर्डिंग्ज लावले आहेत. सदरील होर्डिंग्जमध्ये ७९ हजार ८० रुपये हा सर्वात कमी आणि १ लाख ६३ हजार ५६० रुपये हा सर्वाधिक पगाराचा आकडाही टाकण्यात आला आहे. प्राध्यापकांचे पगार पाच ते सहा आकड्यांत पोहोचले आहेत. हे आकडे पाहून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येत आहे. 

एखाद्या संस्थेला कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा पगार असा सार्वजनिक ठिकाणी जाहीर करता येऊ शकतो. याविषयी काही नियम आहेत का? असा प्रश्नही यातून समोर आला आहे. काही प्राध्यापकांच्या मतानुसार पगारपत्रकांचे आकडे सार्वजनिक ठिकाणी जाहीर करून प्राध्यापकांच्या वैयक्तिकतेचा भंग करण्यात येत आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांमध्येही चुकीचा संदेश जात असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

प्राचार्यांचा पगार गुलदस्त्यातबदनापूर येथील महाविद्यालयातील प्राध्यापकांचा पगार महाविद्यालयात होर्डिंग्ज लावून जाहीर केला आहे. मात्र, यातून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेहेर दत्ताभाऊ पाथ्रीकर यांना वगळण्यात आल्याची माहिती महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दिली. प्राचार्या संस्थाचालकांच्या नातेवाईक असल्यामुळेच त्यांचा पगार गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याचा आरोपही नाव न छापण्याच्या अटीवर प्राध्यापकांनी केला आहे.

विद्यार्थ्यांना माहिती झाले पाहिजेमहाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पगारावर शासन लाखो रुपये खर्च करीत आहे, तरीही प्राध्यापक वर्गात तासिका घेत नाहीत. तास न घेणाऱ्या प्राध्यापकांच्या पगारांचे आकडे विद्यार्थी, पालकांनाही समजले पाहिजेत, त्यांनी प्राध्यापकांना तास घेण्याचा आग्रही केला पाहिजे. यासाठी महाविद्यालयातील दर्शनी भागात पगाराचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. याविषयी शासनाला कळविण्यात येणार आहे.- दत्ताभाऊ पाथ्रीकर, संस्थाचालक, बदनापूर महाविद्यालय

विद्यार्थी, पालकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रकारभारतातील कोणत्याही संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचे सार्वजनिक ठिकाणी जाहीर प्रगटन केले जात नाही. मात्र, बदनापूर महाविद्यालयात ते करण्यात आले आहे. कोणाचेही पगार सार्वजनिक ठिकाणी लावण्यापूर्वी संबंधितांची परवानगी घेतली पाहिजे. कारण ही बाब गोपनीय आहे. बदनापूर महाविद्यालयातील प्रकार हा प्राध्यापकांच्या गोपनीयतेचा भंग आहे. यातून विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्राध्यापकांविषयी गैरसमज पसरविण्यात येत आहे. हे पूर्णत: चुकीचे आहे.- डॉ. मारोती तेगमपुरे, जालना जिल्हाध्यक्ष, बामुक्टो संघटना

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालयAurangabadऔरंगाबादProfessorप्राध्यापक