शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी वेठीस; आरक्षणाच्या घोळात अडकली अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:45 IST

यंदा कोरोनामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमासह अन्य सर्वच अभ्यासक्रमांवर परिणाम झाला आहे.

ठळक मुद्दे अभियांत्रिकी प्रवेशाची सूचना अद्याप निघालीच नाही 

औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्यामुळे यंदा अभियांत्रिकी, तंत्रनिकेतनसह सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. 

यंदा कोरोनामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमासह अन्य सर्वच अभ्यासक्रमांवर परिणाम झाला आहे. ‘सीईटी’ परीक्षाही उशिरा झाली. दुसरीकडे, कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न होत असताना मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. तथापि, तंत्रनिकेतन, आयटीआय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी सप्टेंबरमध्येच ‘एसईबीसी’ प्रवर्गातून प्रवेश अर्ज केले होते. आता त्या प्रवेश अर्जात दुरुस्ती करुन खुल्या किंवा आर्थिक मागास प्रवर्ग, असे नमूद करण्याची भूमिका संबंधित प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. ‘सीईटी’चा निकाल जाहीर होऊन तीन दिवसांचा कालावधी लोटला, तरी अद्याप राज्य प्रवेशपूर्व परीक्षाने अभियांत्रिकी प्रवेशाची अधिसूचना अद्याप जाहीर केलेली नाही. याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. प्रवेशाची अधिसूचना का जारी झालेली नाही, याबाबत तंत्रशिक्षण संचालनालय किंवा राज्य प्रवेशपूर्व कक्षाकडून मौन बाळगण्यात आले आहे. 

यासंदर्भात तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर म्हणाले की, अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत दोन दिवसांत अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. आम्ही पण, अधिसूचनेची वाट बघत आहोत. ‘सीईटी’चा निकाल लागल्यानंतर चौथा शनिवार, रविवार, सोमवारी गुरुनानक जयंती व आज मंगळवारी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक अशा सलग चार दिवस सुट्या आल्या. कदाचित उद्या किंवा परवा अधिसूचना निघू शकते. यावेळी अभियांत्रिकी प्रवेशाच्या दोन फेऱ्या होतील. तिसरी समुपदेशन फेरी राहील.

तंत्रनिकेतन प्रवेशासाठी ५ डिसेंबरपर्यंत अर्जात दुरुस्तीची मुदतसन २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रासाठी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासाठी सप्टेंबर महिन्यात प्रवेश अर्ज भरले आहेत. ज्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्ग नमूद केला आहे. ०२त्या विद्यार्थांना आपल्या अर्जात खुला किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद करावा लागणार आहे. यासाठी ५ डिसेंबरपर्यंत अर्जात दुरुस्तीसाठी मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादcollegeमहाविद्यालय