शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तरूणावर चाकूहल्ला करून पळालेल्या भु-याला दोन तासांत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 20:56 IST

पैठणगेट येथील एका टपरीवर तरुणावर चाकूहल्ला करून त्याच्या खिशातील सात हजार रुपये हिसकावून नेणाºया कुख्यात भु-या उर्फ वाजीद बबलू कुरेशी (रा. सिल्लेखाना) हा घाटीतील पोलिसांच्या सतर्कतमुळे क्रांतीचौक पोलिसांच्या हाती लागला.

औरंगाबाद : पैठणगेट येथील एका टपरीवर तरुणावर चाकूहल्ला करून त्याच्या खिशातील सात हजार रुपये हिसकावून नेणाºया कुख्यात भु-या उर्फ वाजीद बबलू कुरेशी (रा. सिल्लेखाना) हा घाटीतील पोलिसांच्या सतर्कतमुळे क्रांतीचौक पोलिसांच्या हाती लागला. आरोपी भु-याला घटनेनंतर अवघ्या दोन तासांत बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी सांगितले की, पैठणगेट येथील असद कुरेशी हे शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास एका हॉटेलजवळील पानटपरीवर उभे होते. त्यावेळी आरोपी भुºया तेथे आला आणि त्याने असद यांच्याकडे सिगारेटसाठी पैसे मागितले. असद यांनी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे भुºयाला सांगितले. याचा राग धरुन भुºयाला त्याने असद यांच्यावर अचानक हल्ला चढविला. त्यांच्या खिशातील रोख सात हजार रुपये जबरीने काढून घेतले. या झटापटीत भुºयालाही मार लागला. यानंतर तो पैठणगेट येथून पळून गेला. या घटनेमुळे पैठणगेट परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, सहायक निरीक्षक एस.एस. जाधव, गुन्हेशाखेच्या अधिकारी कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तो घाटी रुग्णालयातील अपघात विभागात उपचारासाठी दाखल झाला. तो अपघात विभागात आरडाओरड करीत होता. यामुळे तेथील डॉक्टर घाबरले होते. त्यांनी सुरक्षारक्षकांना बोलावून घेतले. त्याचवेळी घाटी चौकीतील पोलीस कर्मचारी तेथे दाखल झाले तेव्हा त्यांना हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार भुºया असल्याचे समजले. त्यांनी अन्य कर्मचाºयांच्या मदतीने ताब्यात घेतले आणि क्रांतीचौक पोलिसांना आरोपीची माहिती कळविण्यात आली. सहायक निरीक्षक जाधव आणि कर्मचाºयांनी घाटीत जाऊन भुºयाला बेड्या ठोकल्या. असद यांच्या तक्रारीवरून भुºयाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.एमपीडीएक कारवाईतून सुटला अन...कुख्यात भुºयाकडून यापूर्वीही एका अंडा आम्लेट सेंटर चालकावर हल्ला झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएची कारवाई करून त्याला हर्सूल जेलमध्ये डांबले होते. पोलीस आयुक्तांनी भुºयावर केलेली कारवाई उच्चस्तरीय समितीने रद्द ठरविल्याने भुºया कारागृहातून बाहेर आला. पोलिसांच्या रेकॉर्डवरील तो सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र या कारवाईचा कोणताही परिणाम भुºयावर झाला नसल्याचे रात्रीच्या घटनेवरुन समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद