शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

'नागरिकांची लससाठी धडपड'; संपूर्ण शहर ‘लसवंत’ होण्यास लागतील दोन वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 19:36 IST

Corona vaccine in Aurangabad केंद्र शासनाकडून राज्याला मुबलक डोस मिळत नाहीत. त्यामुळे अत्यल्प लस डोस प्राप्त होते.

ठळक मुद्देकेंद्राकडून मुबलक कोरोन लस मिळेनातनागरिकांची लससाठी धडपड सुरूच 

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला तर संबधित व्यक्ती ७० टक्के, दुसरा डोस घेतला तर ९७ टक्के सुरक्षित राहील असा दावा केंद्र शासनाचा आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वी लस घेण्यावर प्रत्येक नागरिक भर देत आहे, परंतु शहरात लसीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तीन महिन्यांपासून नागरिकांना लसीसाठी भटकत आहेत. पहिला डोस घेतलेल्या ९२ हजार नागरिकांना कालमर्यादा उलटूनही दुसरा डोस मिळेना. दुसऱ्या बाजूला पहिल्या डोससाठीही गर्दी होते आहे. अशा स्थितीत तिसरी लाट रोखणार तरी कशी? असा प्रश्न नागरिकच उपस्थित करीत आहेत.

अद्याप पहिलाच डोस मिळेनामहापालिकेने मागील काही दिवसांपासून फक्त दुसरा डोस देण्यास प्राधान्य दिले आहे. पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागतेय. ऑनलाइन बुकिंग आम्हाला करता येत नाही. लसीकरण केंद्रावर दररोज चकरा मारून थकलोय. पूर्वी थेट केंद्रावर गेल्यावर पहिला डोस मिळत होता. हीच पद्धत पुढेही सुरू ठेवावी.- रवी मोहिते, लाभार्थी

कोरोनाकाळात अनेक संकटांचा सामना करावा लागला. सुदैवाने लस सापडली. पण ती सर्वसामान्य गोर-गरीब नागरिकांना मिळत नाही. लसीकरण केंद्रावर मर्जीतील मंडळींनाच टोकन, मागील दाराने प्रवेश दिला जातो. सर्वसामान्यांना लस संपली, उद्या या एवढाच निरोप देण्यात येतो. लसीकरणात पारदर्शकता असायला हवी. ५० टक्के पहिला, ५० टक्के दुसरा डोस सर्वांना द्यावा.- शैलेश जाधव , लाभार्थी

लसीकरण का वाढेनाकेंद्र शासनाकडून राज्याला मुबलक डोस मिळत नाहीत. त्यामुळे अत्यल्प लस डोस प्राप्त होते. मागणीच्या तुलनेत १० टक्केही पुरवठा नाही. शहराला दररोज २० हजार डोसची गरज आहे. एकदा १० ते ११ हजार डोस आल्यानंतर आठ दिवस लस मिळत नाही. त्यामुळे लसीकरणाची गती प्रचंड मंदावली आहे. दुसरा डोस मिळावा म्हणून औरंगाबाद शहरातच ९२ हजारांहून अधिक नागरिक प्रतीक्षा यादीत आहेत. वारंवार मागणी केल्यानंतरही डोसची संख्या वाढवून मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड वैतागले आहेत.

१५ केंद्रांवर लसीकरण सुरूऔरंगाबाद शहरात ११५ वॉर्डात लसीकरण करण्याची सोय मनपाने उभी केली. लस डोस पुरेसे मिळत नसल्यामुळे अलीकडे ३९ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. मंगळवारी मनपाकडे ३ हजारच डोस शिल्लक होते. त्यामुळे अवघ्या १५ केंद्रांवरच लसीकरण करण्यात आले. लस साठा उपलब्ध झाला तर पुन्हा ३९ केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. गरोदर महिला, अंथरुणावरील रुग्णांना घरी जाऊन लस देणे अद्याप सुरूच झालेले नाही.

आतापर्यंत झालेले लसीकरण : वयोगट-पहिला डोस-दुसरा डोसहेल्थलाइन वर्कर- २९,२३२-१६,५३८फ्रन्टलाइन वर्कर- ३७,६६६,२१,६५८१८ ते ४४- १,५७,९०९- ११,५२४४५ ते ५९ -१,०१,२५५-६६,८६६६० पेक्षा अधिक- ६८,३८१-४४,७२० 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबाद