शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडची प्रस्तावित एमआयडीसीला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा प्रखर विरोध

By बापू सोळुंके | Updated: December 19, 2023 15:41 IST

या एमआयडीसीसाठी तालुक्यातील रजाळवाडी, मोढा बुद्रुक, मंगरूळ आणि डोंगरगाव येथील एकूण ७०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड येथे प्रस्तावित नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शविल्यामुळे ही एमआयडीसी बारगळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लाेड तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. तसेच सिल्लोड, कन्नड आणि भोकरदन तालुक्यांत मोठ्या प्रमाणात कापूस, अद्रक, मिरची आणि मक्याचे उत्पादन होते. या शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग यावेत, यासाठी गतवर्षी सिल्लोडचे आ. तथा राज्याचे वक्फ आणि पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडसाठी स्वतंत्र एमआयडीसी मंजूर करून घेतली. या एमआयडीसीसाठी तालुक्यातील रजाळवाडी, मोढा बुद्रुक, मंगरूळ आणि डोंगरगाव येथील एकूण ७०० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शासनानेही या भूसंपादनास मंजुरी दिली होती. आपली चांगली जमीन एमआयडीसीसाठी घेतली जाणार असल्याचे शेतकऱ्यांना समजताच त्यांनी त्यांच्या मालकीची जमीन देण्यास विरोध दर्शविला. काहीही झाले तरी आम्ही आमची जमीन एमआयडीसीसाठी देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी शासनास आणि एमआयडीसीला दिले होते. पहिल्या टप्प्यात सिल्लोड येथे १५० हेक्टर जमिनीवर एमआयडीसी उभारू. 

या एमआयडीसीला प्रतिसाद मिळाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने आणखी जमीन घेऊन औद्योगिक वसाहतीचा विस्तार करू, असा एमआयडीसीचा मनोदय होता. मात्र, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आग्रहाने ७०० हेक्टरवर एमआयडीसी उभारण्यास शासनाने मंजुरी दिली. मागील चार महिन्यांपासून शासनाचे अधिकारी जमीन भूसंपादन करण्यासाठी शेतकऱ्यांना भेटत आहेत, तेव्हा एमआयडीसीसाठी आपल्या मालकीच्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. परिणामी, जमीन भूसंपादनाची अधिसूचना अद्याप जारी करण्यात आली नाही. शेतकऱ्यांकडून असाच विरोध राहिल्यास प्रस्तावित एमआयडीसी बारगळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीAbdul Sattarअब्दुल सत्तारState Governmentराज्य सरकार