शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक हितासाठी विरोध केल्यास कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:57 IST

सर्वोच्च न्यायालयाने शहरातील कचरा प्रश्नावर शासन नियुक्त समितीला निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. या समितीने चिकलठाणा येथील दुग्धनगरीच्या जागेवर केंद्रीय कचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून, ज्या नागरिकांचा याला विरोध असेल त्यांच्यासोबत सामंजस्याने चर्चा करण्यात येईल. वैयक्तिक हितासाठी कोणी विरोध करीत असेल, तर त्यावर अवमान याचिकेद्वारे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने शहरातील कचरा प्रश्नावर शासन नियुक्त समितीला निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. या समितीने चिकलठाणा येथील दुग्धनगरीच्या जागेवर केंद्रीय कचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून, ज्या नागरिकांचा याला विरोध असेल त्यांच्यासोबत सामंजस्याने चर्चा करण्यात येईल. वैयक्तिक हितासाठी कोणी विरोध करीत असेल, तर त्यावर अवमान याचिकेद्वारे कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला.सोमवारी सकाळी आयुक्तांनी वेळात वेळ काढून महापालिकेत कचरा प्रश्नावर सर्व विभाग प्रमुख, वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी शहरातील कचरा प्रश्नाचा झोननिहाय आढावा घेतला.झोन १ ते ९ पर्यंतच्या सर्व वॉर्ड अधिका-यांनी आमच्याकडे ७० ते ८० टक्के कच-याचे वर्गीकरण होत असल्याचा दावा त्यांनी केला. ओल्या कच-यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत असून, पूर्वीच्या तुलनेत प्रक्रिया केंद्र वाढविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.यानंतर प्रभारी आयुक्त राम यांनी सांगितले की, महाराष्टÑ प्ररूषण नियंत्रण मंडळाने न्यायालयात अ‍ॅक्शन प्लॅन सादर केला आहे. यानुसारच पुढील प्रक्रिया पूर्ण होईल. चिकलठाणा येथील नियोजित जागेच्या आसपास वसाहत नाही, पाण्याचे जलस्रोत नाहीत. त्यामुळे येथे विरोध होण्याचे फारसे कारणही नाही. वैयक्तिक हितासाठी कोणी विरोध केल्यास खटला दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. चिकलठाणा येथे १०० टक्के कचºयावर प्रक्रिया होणार असल्याचे त्यांनी बैठकीत नमूद केले. नागरिकांसोबत चर्चा करून त्यांचे समाधान करण्यात येणार असल्याचे राम यांनी शेवटी नमूद केले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादNavalkishor Ramनवलकिशोर राम