शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

By admin | Updated: July 4, 2016 00:18 IST

उस्मानाबाद : शहरातील आठवडी बाजारात बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देवून मोबाईल चोरांनी आपली ‘हातसफाई’ सुरूच ठेवली आहे़

उस्मानाबाद : शहरातील आठवडी बाजारात बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देवून मोबाईल चोरांनी आपली ‘हातसफाई’ सुरूच ठेवली आहे़ शहरातील रविवारच्या आठवडी बाजरात चौघांचे मोबाईल चोरीस गेल्याच्या तक्रारी ठाण्यात धडकल्या आहेत़ तर नाईकवाडी प्लॉटिंगजवळील रस्त्यावरून बार्शीनाक्याकडे जाणाऱ्या एका वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केले़उस्मानाबाद शहरातील आठवडी बाजारात शहरासह परिसरातील अनेक शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी घेवून येतात़ तर जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील अनेक व्यापारीही आठवडी बाजारात येतात़ रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातील नागरिकांची वर्दळ आणि चोरट्यांचा धुमाकूळ पाहता शहर ठाण्याकडून बंदोबस्त तैनात करण्यात येतो़ मात्र, पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मोबाईल चोरट्यांनी हातोहात सर्वसामान्यांचे मोबाईल लंपास करण्याचा प्रकार मागील वर्षापासून सुरूच ठेवला आहे़ मध्यंतरी थांबलेले मोबाईल चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे़ रविवारच्या आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या गोविंद चव्हाण (रा़ कोथळी ता़उमरगा, ह़मु़बीअ‍ॅन्डसी क्वॉर्टर, उस्मानाबाद), धीरज कोल्हे (रा़तांबरी विभाग), विलास सुरवसे (रा़ जहागिरदारवाडी), अविनाश छगनराव चांदणे (रा़ सारोळा) या चौघांचे मोबाईल चोरट्यांनी हातोहात लंपास केले़ याबाबत गोविंद चव्हाण आणि अविनाश चांदणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़उस्मानाबाद शहरातील समता नगर भागात राहणाऱ्या पुष्पा बाळकृष्ण माढेकर (वय-७०) या शनिवारी रात्रीच्या सुमारास बार्शी नाका येथील खासगी दवाखान्यात स्वत:वर उपचार घेण्यासाठी जात होत्या़ नाईकवाडी प्लॉटिंगजवळील मार्गावरून बार्शीनाक्याकडे जात असताना अज्ञात दुचाकीस्वार इसमांनी त्यांच्या गळ्यातील सव्वा लाखाचे चार तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावून नेले़ त्यांनी आरडाओरड केली मात्र, चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते़ याबाबत पुष्पा माढेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि मोतीराम बगाड करीत आहेत़ शहरातील आठवडी बाजारात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मोबाईलची चोरी होत आहे़ तर रात्रीच्यावेळी पेट्रोलिंग असतानाही दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केले आहेत़ बंद झालेले चैन स्नॅचिंगचे प्रकार पुन्हा घडला आहे़ यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देवून आठवडी बाजारातील बंदोबस्त व रात्रीची पेट्रोलिंग वाढवावी अशी मागणी होत आहे़