शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कडक सुरक्षा व्यवस्था नावालाच; उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय फोडून चोरट्यांनी दारू लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 12:56 IST

शासकीय दूध डेअरीमागे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांचे कार्यालय आहे. तेथेच भरारी पथकाचे निरीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांचीही कार्यालये आहेत.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या कारवाईत चार चोरट्यांना अटक

औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून दारू तस्करांकडून जप्त केलेल्या दारूसाठ्यापैकी २ लाख ४५ हजार ८१६ रुपयांची दारू चोरट्यानी लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. विशेष म्हणजे ही चोरी जेथे झाली त्याठिकाणी जवानाचा रात्रंदिवस खडा पहारा असतो. या चोरीचा त्याला सुगावा मात्र लागला नसल्याने या घटनेविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली.

शासकीय दूध डेअरीमागे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांचे कार्यालय आहे. तेथेच भरारी पथकाचे निरीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांचीही कार्यालये आहेत. जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई केल्यावर जप्त केलेली देशी, विदेशी बनावटीची दारू येथील मुद्देमाल कक्षात जमा करून ठेवली जाते. अनेक वर्षांपासूनचा मुद्देमाल तेथे ठेवण्यात आलेला आहे. मुद्देमाल सांभाळण्यासाठी उत्पादन शुल्कचा जवान (कॉन्स्टेबल) रात्रंदिवस तेथे तैनात असतो. असे असताना चोरट्यांनी मुद्देमाल कक्षाचा पत्रा उचकटून दारूचे बॉक्स लंपास केले. शुक्रवारी सकाळी सुरक्षा रक्षक जवान एम.एच. बहुरे यांना ही घटना नजरेस पडल्यावर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब कळविली. यानंतर भरारी पथकाचे निरीक्षक ए.जी. कुरेशी यांनी रात्री उशिरा क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.

गुन्हे शाखेने पकडले चोरटेगुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाला या चोरीविषयी माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी संशयिताच्या घराबाहेर २०१६ साली बनलेल्या देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसल्या. पोलिसांनी संशयावरून पवन चावरिया याच्या घरावर छापा टाकला असता त्याने तेथे देशी दारूचे सात बॉक्स जप्त केले. त्यांनी अन्य आरोपी राहुल घुसर, सूरज चावरिया आणि गोकुळ कागडा यांची नावे सांगितली. उत्पादन शुल्क विभागाच्या मुद्देमाल गोडाऊनमधून हा माल चोरून आणल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी