शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञाताने सैन्य जवानास ‘स्ट्रॅटेजी सेंटर’ व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये केलं अॅड; ९ लाखांची झाली फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:59 IST

व्हॉट्सॲपच्या अनोळखी ग्रुपवरील माहितीवर विश्वास ठेवणे लष्कराच्या जवानाला पडले महागात; आधी ९ हजारांचा नफा दिला, नंतर १३ दिवसात ९ लाखांचा गंडा घातला

छत्रपती संभाजीनगर : आदित्य बिर्ला ग्रुपच्या आयपीओत गुंतवणुकीचे आमिष दाखवून लष्करातील जवानाला सायबर गुन्हेगारांनी १३ दिवसांत ९ लाख रुपयांचा गंडा घातला. बुधवारी हर्सूल पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

हर्सूल पोलिस ठाण्याच्या निरीक्षक डॉ. सुनीता मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनाथ वाघ (४९, रा. मयूर पार्क) हे लष्करात जवान आहेत. ८ डिसेंबर रोजी त्यांना अज्ञाताने ‘स्ट्रॅटेजी सेंटर’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. त्यात आर्या आनंद नावाच्या व्यक्तीने आदित्य बिर्ला कंपनीतून बोलत असल्याचे सांगून शेअर मार्केट ट्रेडिंगचे प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवले. एक लिंक पाठवून त्यांना ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. बिर्ला कंपनीच्या आयपीओसाठी अप्लाय करण्यास सांगितले. कॉलवरील व्यक्तीने त्यांचा १८ डिसेंबरपर्यंत विश्वास संपादन केला. त्यानंतर आर्या आनंदच्या सूचनेनुसार, वाघ यांनी २८ व ३० डिसेंबर रोजी त्यांना दोन टप्प्यांत अनुक्रमे ८ लाख २० हजार व ७ लाख २० हजार रुपये बँक खात्यात पाठवले.

म्हणे २०० टक्के नफा झालाय, २० टक्के सर्व्हीस फी भराहा सर्व व्यवहार सायबर गुन्हेगारांच्या एका बनावट वेबसाईटद्वारे सुरू होता. वाघ यांना सुरुवातीला १८ डिसेंबर रोजी ५० हजारांच्या गुंतवणुकीवर ९ हजारांचा नफा देखील दिला. याच वेबसाईटवर त्यांचे शेअर मार्केटचे खाते त्यात होणारा नफा देखील दिसत होता. ३१ डिसेंबर रोजी वाघ यांनी वेबसाईटद्वारे शेअर्स विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हेगारांनी त्यांना पुन्हा संपर्क साधून तुम्हाला २०० टक्के नफा झाला आहे. त्यामुळे ती रक्कम काढण्यासाठी २० टक्के सर्व्हीस फी भरण्यास सांगितले. त्यानंतर मात्र वाघ यांना आपण फसवले जात असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत त्यांनी गुन्हेगारांना ९ लाख रुपये दिले होते.

साधर्म्य साधनारी वेबसाईटआदित्य बिर्ला कंपनीच्या नावाशी साधर्म्य साधणारी वेबसाईट गुन्हेगाराने तयार केली होती. त्यात काही अक्षरांमध्येच बदल केला होता. त्यामुळे त्यांचा विश्वास बसत गेला. निरीक्षक डॉ. सुनीता मिसाळ अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर