शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अजबच: एक गाव दोन जिल्ह्यांत; पण स्थिती... ‘घर का ना घाट का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 05:48 IST

तळेगाववाडीतील पाचशे कुटुंबीयांचे लालफितीच्या कारभारात हाल

रऊफ शेख

लोकमत न्यूज नेटवर्क, फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर): पाचशे कुटुंबसंख्या असलेल्या तळेगाव वाडीची औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन या दोन तालुक्यांच्या दप्तरी नोंद आहे. मात्र, शासकीय लाभाच्या योजनांच्या दोन्ही तालुक्यांच्या यादीत हे गाव ‘मिसिंग’ आहे. तळेगाव व तळेगाव वाडी (बिस्मिल्ला गाव) ही दोन गावे मिळून एक ग्रामपंचायत आहे. भोकरदन तालुक्यातील तळेगाव व तळेगाव वाडीचा सहा वर्षांपूर्वी फुलंब्री तालुक्यात  समावेश केला. वर्षभरानंतर  गावाला पुन्हा भोकरदन तालुक्याला जोडले. पण शिक्षण व ग्रामपंचायतीचा कारभार फुलंब्री तालुक्यातूनच आजही सुरू आहे. ग्रामसेवक फुलंब्री पंचायत समितीअंतर्गत काम करतात. महसूलचा कारभार भोकरदनमध्ये असल्याने तलाठी येथील तहसीलदारांच्या अंतर्गत काम करतात. दोन जिल्हे व दोन तालुक्यांत हे गाव अडकले आहे.

शेतीची किंवा जागेची रजिस्ट्रीही होत नाही  

  • फुलंब्री किंवा भोकरदन तालुक्यात गावातील शेतीची किंवा जागेची रजिस्ट्रीच होत नाही. 
  • ग्रामस्थ आरिफ हाकिम पठाण म्हणाले, माझ्या शेतीचा सौदा झाला; रीतसर रजिस्ट्री करण्यासाठी फुलंब्री तहसील कार्यालयात गेलो असता तुमच्या गावाचे नाव ऑनलाइनमध्ये येत नाही, असे सांगण्यात आले.
  • शेतीचा खरेदी-विक्री व्यवहारच न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात ते ४ वर्षांपासून चकरा मारत आहेत. 
  • ‘पीएम किसान’चा लाभही मिळेना

येथील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही, याकडे मजीद खाँ महेबूब खाँ यांनी लक्ष वेधले. हे गाव महसुली नोंदीनुसार भोकरदन तालुक्यात आहे. ग्रामस्थांच्या निवेदनावरून फुलंब्री तालुक्यात समवेश करण्यासंबंधीचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठांकडे पाठविला ला आहे. त्यावर अद्याप निर्णय आलेला नाही. -डॉ. शीतल राजपूत, तहसीलदार

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र