शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा कंपनीचा अजब कारभार, अंबादास दानवेंना दिला कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला

By बापू सोळुंके | Updated: November 25, 2022 20:15 IST

पीक विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे.

औरंगबााद: जिल्ह्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होईल अथवा नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी विभागीय कृषी सहसंचालकांसमोरच शेतकरी म्हणून पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा त्यांना जवळच्या कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला मिळाला. 

जिल्ह्यातील  ७लाख ४८ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता. दरम्यान संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकाची मोठी हानी झाली. परिणामी शेतकऱ्यांना दिवाळीही साजरी करता आली नव्हती. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पीक विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे. विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांपैकी  केवळ १ लाख ८४ हजार शेतकऱ्यांनाच कंपनीने विमा मंजूर केला आहे. उर्वरित सुमारे पावणे पाच लाख शेतकरी पीक विमा मिळेल अथवा नाही,  तसेच कधी मिळेल  याबाबत सांशकता आहे. 

विमा कंपनीकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही,  कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांना  समर्पक  उत्तरे मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी  विरोधी पक्षनेते दानवे यांना प्राप्त झाल्या होत्या. यापार्श्वभूमीवर दानवे यांनी शुक्रवारी सकाळी विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली.  जालनाचे कृषी अधीक्षक भीमराव रणदिवे,  कृषी उप संचालक दत्तात्रय दिवटे, उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी तेथून पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन लावून ते टेंभापुरी येथील शेतकरी बोलत असल्याचे सांगितले.त्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले असून विमा कंपनीने अद्याप पंचनामा केला नाही,  यामुळे आम्हाला विमा कधी मिळेल असा सवाल त्यांनी केला. असता टोल फ्री क्रमांकावरून त्यांना जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. 

साडेसात लाख पीक विमाधारक शेतकरी, कर्मचारी केवळ २८जिल्ह्यात विमा कंपनीचे २८ कर्मचारी कार्यरत आहेत. ७४ मंडळातील सुमारे पावणेसात लाख शेतकऱ्यांपर्यंत हे कर्मचारी कधी पोहचतील असा सवाल त्यांनी केला. विमा कंपनीचे हे कर्मचारी कृषी पदवीधर अथवा पदविकाधारक असणे गरजेचे आहे. यातील किती कर्मचारी प्रशिक्षित आहेत  असा सवाल त्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना केला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादCrop Insuranceपीक विमा