शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कांदा लिलाव बंद पाडून रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:19 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सकाळच्या सत्रात कमी भाव पुकारल्याच्या कारणावरुन संतप्त शेतकºयांनी कांदा लिलाव बंद पाडून नागपूर- मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सकाळच्या सत्रात कमी भाव पुकारल्याच्या कारणावरुन संतप्त शेतकºयांनी कांदा लिलाव बंद पाडून नागपूर- मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. गोंधळ उडाल्याने वैजापूर पोलिसांच्या मध्यस्थीने पाच तासानंतर लिलाव पूर्ववत झाले.दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने वैजापूर बाजार समितीच्या आवारात कांद्याची प्रचंड आवक येत असून बाजार समितीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहने उभी आहेत.मंगळवारी कांद्याला कमीत कमी ३००, सरासरी ७०० तर जास्तीत जास्त ८५० रुपये क्विंटल भाव पुकारल्याने संतप्त शेतकºयांनी सकाळी अकरा वाजता लिलाव बंद पाडून थेट रास्ता रोको आंदोलन केल्याने महामार्गावर वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती.पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, सहायक पोलीस निरीक्षक रामहरी जाधव, पोलीस नाईक संजय घुगे यांनी शेतकºयांची समजूत काढून त्यांना बाजार समितीच्या आवारात नेले. बाजार समितीचे सचिव विजय सिनगर, संचालक सुरेश तांबे यांनी बाजार आवारात जाऊन रियाज अकील शेख, शकील शेख, आजम सौदागर व इतर व्यापाºयांशू चर्चा करुन दुपारी साडेतीन नंतर लिलाव सुरु केले. पाच तासाच्या गोंधळानंतर लिलाव पूर्ववत सुरु झाले. यावेळी कांद्याला २०० ते ३०० रुपये क्विंटलमागे वाढीव भाव मिळाला.होळी सणामुळे आठ दिवस मार्केट बंद राहणार असून त्यामुळे भाव पडण्याची भीती व उन्हाच्या चटक्यामुळे चाळीतील कांदे सडण्याची शक्यता यामुळे धास्तावलेल्या शेतकºयांनी कच्चा व अपरिपक्व कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये एकाच दिवशी नवीन हळव्या कांद्याची तब्बल ३०० ते ३५० ट्रक आवक झाली. यामुळे व्यापाºयांनी कांद्याचे दर पाडले.३०० ते ३५० वाहनांची आवकगेल्या दोन-अडीच महिन्यांपासून बाजारात कांद्याची आवक कमी होती. त्यात नवीन कांद्याचा नवीन हंगाम सुरू झाला नसल्याने व जुन्या कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दराने उच्चांकी गाठली होती. यामुळे चांगला दर मिळेल, या अपेक्षेने शेतकºयांनी कच्चा कांदाच मोठ्या प्रमाणात बाजारात आणला आहे. यामुळे मंगळवारी खुल्या कांद्याची तब्बल ३०० ते ३५० वाहनात उच्चांकी आवक झाली. आवक वाढल्याने व कांदा कच्चा असल्याने दर कमी झाले, असे सचिव विजय सिनगर यांनी सांगितले.नवीन कांद्याची आवक वाढलीच्गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कांद्याला चांगला भाव मिळत आहे. यंदा तालुक्यात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे या दिवसात कांदा लवकर खराब होतो व मोड येतात. त्यामुळे येथील शेतकरी कांदा साठविण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यात कांद्याला सध्या चांगले दर मिळत असल्याने या परिसरातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात नवीन कांदा बाजारात आणला आहे. या कांद्याला वजनदेखील चांगले असते, यामुळे कांद्याची आवक वाढून दर कमी झाले.