शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गँगस्टर इम्रान मेंहदी आणि कुरेशी समर्थकात कोर्ट आवारातच राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 19:18 IST

कुख्यात गँगस्टर तथा सुपारी किलर इम्रान मेंहदी आणि मृत माजी नगरसेवक सलीम कुरेशी समर्थकांमध्ये आज सायंकाळी जिल्हा कोर्टाच्या आवारात जोरदार हाणामारी झाली. यात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर घाटी रुग्णालयातसुद्धा दोन्ही गट परत एकदा आमने - सामने आल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला.

औरंगाबाद : कुख्यात गँगस्टर तथा सुपारी किलर इम्रान मेंहदी आणि मृत माजी नगरसेवक सलीम कुरेशी समर्थकांमध्ये आज सायंकाळी जिल्हा कोर्टाच्या आवारात जोरदार हाणामारी झाली. यात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर घाटी रुग्णालयातसुद्धा दोन्ही गट परत एकदा आमने - सामने आल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला. 

माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्यासह अन्य हत्या सुपारी घेऊन करणारा कुख्यात गँगस्टर इम्रान मेंहदीसह त्याचे साथीदार मोक्कांतर्गत हर्सूल कारागृहात कैद आहेत. सलीम कुरेशी यांच्या खूनाचा खटला मोक्का न्यायालयातच सुरू आहे. या खटल्याची न्यायालयात आज तारीख असल्याने मेहंदीसह त्याच्या साथीदारांना जिल्हाकोर्टात आणण्यात आले होते.  यावेळी सुनावणीसाठी मेंहदी गँग आणि मृत कुरेशी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्यात जुने वैमनस्य असल्याने ते ऐकमेकांना खुणावत होते. खटल्याची सुनावणी संपल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्तात आरोपींना पोलिसांच्या गाडीमध्ये बसविले. यावेळी त्यांच्यामागोमाग कोर्टातून बाहेर आलेल्या दोन्ही गटाच्या लोकांमध्ये जोरदार हाणमारी सुरू झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत पाच जण जखमी झाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलिसांची प्रचंड धावपळ उडाली. पोलिसांच्या वाहनांवरही दगड फेकण्यात आले यात गाडीचा आरसा फुटला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलीस आणि पोलीस नियंत्रण कक्षातील पोलिसांनी कोर्टात धाव घेतली. यावेळी पोलिसांचे संख्याबळ वाढल्याचे पाहताच दोन्ही गटाचे काही लोक गायब झाले. शेख सद्दाम उर्फ याबा शेख इमाम(३०,रा. युनूस कॉलनी)आणि महमंद खालेद सिद्दीकी(रा.आसेफिया कॉलनी) हे जखमी झाले असून त्यांना घाटीत दाखल करण्यात आले.  त्यानंतर पोलिसांनी आरोपी मेंहदी आणि त्याच्या साथीदारांची रवानगी हर्सूल कारागृहात केली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालयPoliceपोलिस