शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनसाठी आत्मनिर्भरतेकडे पाऊल; घाटी रुग्णालयात दररोज १२५ जम्बो सिलिंडर निर्मितीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 17:38 IST

लिक्विड ऑक्सिजनच्या बाबतीत घाटीत मोठी क्षमता आहे. ५३ हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन साठवणुकीची क्षमता असून, ही क्षमता आणखी २० हजार लिटरने वाढणार आहे.

ठळक मुद्दे ‘सीएमआयए’कडून प्रकल्प घाटीला हस्तांतरित

औरंगाबाद : चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (सी.एम.आय.ए.) घाटी रुग्णालयात उभारण्यात आलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सोमवारी घाटी प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आला. या प्रकल्पातून दररोज १२५ जम्बो सिलिंडर इतक्या ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याकडे घाटीचे पाऊल पडले आहे.

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या हस्तांतरप्रसंगी खा. इम्तियाज जलील, खा. भागवत कराड, आ. सतीश चव्हाण, आ. संजय शिरसाट, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत, उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, सचिव सतीश लोणीकर, माजी अध्यक्ष राम भोगले, प्रसाद कोकीळ आदींची उपस्थिती होती. मेडिसीन विभागासमोरील जागेत हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. यातून रोज १२५ जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होईल. यातून ६० खाटांना ऑक्सिजन पुरविणे शक्य होणार असल्याचे सतीश लोणीकर यांनी सांगितले.प्रकल्पाच्या हस्तांतरणानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, लिक्विड ऑक्सिजनच्या बाबतीत घाटीत मोठी क्षमता आहे. ५३ हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन साठवणुकीची क्षमता असून, ही क्षमता आणखी २० हजार लिटरने वाढणार आहे. जिल्हाभरातही ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प केले जात आहेत. कोरोना काळात उद्योजकांनी मोठी मदत केली. सर्वांच्या प्रयत्नांमुळे औरंगाबाद शहर लेव्हल-१ मध्ये आले. त्यामुळे शहरात सर्व काही खुले झाले. पण शिस्त पाळली नाही तर ही लेव्हल बिघडण्याचा धोका आहे. त्यामळे सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. खा. जलील म्हणाले, उद्योजकांनी जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. आ. चव्हाण म्हणाले, मनुष्यबळ कमी असतानाही घाटीतील कर्मचारी चांगले काम करीत आहेत. आ. शिरसाट म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटनस्थळेही सुरु करण्याची गरज आहे. कार्यक्रमास डाॅ. कैलास झिने, डाॅ. सुधीर चौधरी, डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. ज्योती बजाज-इरावणे, डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, डाॅ. राजश्री साेनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे के. एम. आय. सय्यद, अजय काळे आदी उपस्थित होते.

औरंगाबादेत ‘पीजीआय’ची मागणीखा. भागवत कराड म्हणाले, चंडीगढप्रमाणे औरंगाबादेत पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे औरंगाबादचे नाव वैद्यकीय दृष्टीने देशाच्या नकाशावर येईल. घाटीत सुविधा चांगल्या आहेत. तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबाद