शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

‘स्पेशल इंट्रेस्ट टूर’ने वाढतोय पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरात मुक्काम; परिसरातही भटकंती वाढली

By संतोष हिरेमठ | Updated: December 28, 2023 11:20 IST

अजिंठा, वेरुळ, बीबी का मकबऱ्यापाठोपाठ इतर स्थळांकडे वळताहेत पर्यटकांची पावले

छत्रपती संभाजीनगर : ‘एसआयटी’ म्हटले की अनेकांची घाबरगुंडी उडते. पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरसाठी मात्र ‘एसआयटी’ फायदेशीर ठरू पाहत आहे. ही ‘एसआयटी’ काही चौकशीसाठी नसून, पर्यटन वाढीला हातभार लावणारी आहे. ‘स्पेशल इंट्रेस्ट टूर’ (एसआयटी) ही संकल्पना राबविली जात असून, त्यातूनच पर्यटननगरीत पर्यटकांचा मुक्काम २ ते ३ दिवसांवरून आता ७ दिवसांपर्यंत वाढत आहे.

पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरमध्ये यायचे आणि अजिंठा, वेरुळ लेणी, बीबी का मकबरा पाहून परत जायचे, असेच काहीसे नियोजन असते. त्यामुळे २ ते ३ दिवसांत पर्यटक शहरातून रवाना होतात. मात्र, शहरातील इतर स्थळांकडे पर्यटकांना वळविण्यात येत असून, त्यातून पर्यटकांचा मुक्काम ७ दिवसांपर्यंत वाढण्यास हातभार लागत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून ‘स्पेशल इंट्रेस्ट टूर’’ यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. याअंतर्गत ऐतिहासिक स्थळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे, असे ‘एमटीडीसी’चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल म्हणाले.

काय आहे ‘एसआयटी’त?केवळ छायाचित्र काढून रवाना होण्यापेक्षा प्रत्येक स्थळाची अभ्यासपूर्ण माहिती घेण्यावर भर दिला जात आहे. यात अजिंठा, वेरुळ, बीबी का मकबऱ्यासह शहरातील बीबी का मकबरा, बुद्ध लेणी, ऐतिहासिक दरवाजे, पाणचक्की, नहर, सोनेरी महाल, सोनेरी महाल परिसरातील लाला हरदौल चबुतरा (समाधी) आदी स्थळांना पर्यटक भेटी देत आहेत.

प्रत्येक स्थळ महत्त्वाचे

अजिंठा, वेरुळ लेणीशिवाय येथील प्रत्येक स्थळ महत्त्वाचे आहे. शहरातील अनेक ऐतिहासिक दरवाजे चांगल्या स्थितीत आहे. तेही पाहण्यासारखे आहेत. ‘स्पेशल इंट्रेस्ट टूर’च्या माध्यमातून ऐतिहासिक स्थळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने आम्ही २८ जण या पर्यटननगरीत आलो.- रमीन खान, दिल्ली.

शहराविषयी इतरांना सांगेलछत्रपती संभाजीनगरचे नाव ऐकले होते. आता प्रत्यक्ष या ऐतिहासिक शहराला पाहता आले. येथील स्थळांविषयी, त्यांच्या इतिहासाविषयी माहिती घेताना खूप रोमांचक वाटले. या शहराविषयी मी इतरांनाही नक्की सांगेन.- रवींद्रसिंग परिहार, दिल्ली

पर्यटननगरीत महिन्याला किती पर्यटक?स्थळ- भारती पर्यटक- परदेशी पर्यटकवेरुळ लेणी - १, ५४, ५१२-७५३अजिंठा लेणी -४८,६०८-५४०बीबी का मकबरा- १,००,११६-३१७देवगिरी किल्ला (दौलताबाद)- ५७,६६९-१८२बुद्ध लेणी - १६, ६१५-५३

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद