शहरं
Join us  
Trending Stories
1
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
2
"काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
3
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
4
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
5
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
6
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
7
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
8
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
9
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
10
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
11
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
12
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
13
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
14
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
15
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
16
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
17
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
18
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
19
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
20
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला

बोगस लोकांपासून दुर रहा, शरिराचे जास्त लाड करु नका: भारत गणेशपुरे

By योगेश पायघन | Published: October 19, 2022 7:32 PM

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण सृजनरंग समारंभ बुधवारी थाटात अन् जल्लोषात पार पडला.

औरंगाबाद : ‘युवक महोत्सव ही एक नशा असते. कला आणि कलाकारांचे मुल्यमापन होऊ शकत नाही. कलाकारांच्या बायोडाटावर जात नसते. आपला भाग समृद्ध करण्यासाठी कलाकारही लागतो. जे यश दुर होतं ते मकरंदमुळे जवळजवळ आलं. बोगस लोकांपासून दुर रहा. शरिराचे जास्त लाड करु नका. हे शरीर देवाच्या घरुन आणलेलं भाड्याचे बैल आहे हे वाक्य लक्षात ठेवा. असे अभिनेते भारत गणेशपुरे म्हणाले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण सृजनरंग समारंभ बुधवारी थाटात अन् जल्लोषात पार पडला. त्यावेळी ते बोतल होते, गणेशपुरे म्हणाले, ‘काम करत रहा. फक्त प्रेमात पडू नका. म्हणजे कलाकृती, बक्षीसाच्या प्रेमात पडू नका. जे प्रेमात पडतात, ते तिथेच राहतात. अभिनय क्षेत्रात काम करायचे असेल तर विद्यापीठ गेट बाहेर पडल्यावर इथे काय शिकलो ते विसरुन जा. ते शिकवणीचं गाठोडे वेळ आले तेव्हा वापरा. मनासारखं पण शिस्तीत जगा.’ प्रकुलगुरू डॉ श्याम शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविकात डॉ संजय सांभाळकर यांनी केले. यावेळी वृत्तसाधनाच्या अंकाचे विमोचन झाले. सूत्रसंचालन विनोद जाधव यांनी केले. आभार कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांनी मानले. मंचावर संयोजन सल्लागार समिती सदस्य डॉ.आनंद देशमुख, प्रा. संभाजी भोसले, प्राचार्य डॉ.जयंत शेतवेकर, डॉ.दासू वैद्य, डॉ.मुस्तजिब खान, डॉ.शिरीष अंबेकर, डॉ.हंसराज जाधव, डॉ.विद्या प्रधान, डॉ.शिवाजीराव देशमुख, डॉ.संजय पाटील देवळाणकर, डॉ.भारती पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती 

कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा.... अभिनेते सुहास शिरसट यांच्या जीवन प्रवासाची गणेश शिंदे यांनी बनवलेली दृष्यफित दाखवण्यात आली. त्यावेळी शिरसट यांच्या डोळ्यात पाणी आले. आठवणींना उजाळा देतांना त्यांच्या जीवनप्रवासाच्या या मनोगताने सभागृह भारावून गेले होते. याच दरम्यान बीडच्या भूमिपुत्राचे स्वागत म्हणून कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा, बीड जिल्हा अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

स्वतःला फसवू नका : सुहास सिरसाट सिने अभिनेते सुहास सिरसाट म्हणाले, ‘युवक महोत्सवाने मला अभिनयाचा आत्मविश्वास दिला. तर वेळेचं भान गुरूंनी दिले. लहानपणी काळ्या म्हटलं तर राग येत होता. पण आज याच रंगाचे मार्केट आहे. निगेटिव्ह पॉईंट बाजूला करून पॉझिटिव्ह पॉईंट घेऊन पुढे गेलो. टॅलेंट दाखवलं तर यशाला पर्याय नसतो. चार वर्षे नाटकं केल्याने काम मिळाले. २० वर्षांपूर्वी समोर प्रेक्षकात बसलो होतो. आज स्टेजवर उभा आहे. हे एकट्याचे नाही. गुरुजन आणि मित्रांच्या साथीने शक्य झाले. कुटुंबियांनी साथ दिली म्हणून आयुष्याला बारावी नापास झाल्यावर कलाटणी मिळाली. कामाशी प्रामाणिक रहा. स्वतःला फसवू नका. घरच्यांना विश्वासात घ्या. १८ वर्षांपासून काम करतोय पण अजूनही स्ट्रगल सुरू आहे. चांगला नट अन् माणूस बनण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशी प्रांजळ कबुली यावेळी सिरसट यांनी दिली.

दिलगीरी, दंड अन् सुधारणा : कुलगुरू अध्यक्षीय समारोपात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले, ‘परीक्षेचा अभ्यासक्रम दरवर्षी बदलतो. मात्र आयुष्यात जीवनाचा अभ्यासक्रम दररोज बदतो. संघर्षमय जीवनाची परीक्षा यशस्वी व्हा. अनासपुरे आणि गणेशपुरे यांनी नाव भाषा बदलली नाही, तरीही त्यांनी त्यांच्या भाषेतील कलेला राजाश्रय मिळवून दिला. युवक महोत्सावात नोंदणी केलेल्या २४७ पैकी १८९ महाविद्यालयानी सहभाग नोंदवला. तर ५८ संघ सहभागी झाले नाही. तर महोत्सवात सहभागी न घेणाऱ्या महाविद्यालयांना आर्थिक दंड व अ‍ॅकडमिक ऑडीट मध्ये गुण वजा करू. पुढच्या वर्षी एप्रिल मध्येच महोत्सवाचे वेळापत्रक तयार करू. नियोजनात विद्यापीठ प्रशासन कमी पडले. त्यामुळे विद्यार्थ्यी परीक्षकांची जेवणाची गैरसोय झाली. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माध्यमांनी उणिवा दाखवल्याने त्या आम्ही सुधारल्याने त्यांचेही आभार मानतो.’ 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादBharat Ganeshpurayभारत गणेशपुरे