लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. भागवत सोपानराव नाईकवाडे यांना महाराष्टÑ व्हेटर्नरी कौन्सिलने नोटीस बजावली आहे. कौन्सिलकडे २०१२ पासून आजपर्यंत त्यांनी रजिस्ट्रेशनचे नूतनीकरणच केलेले नाही. नियमानुसार ते सध्या डॉक्टर नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा अधिकारही नाही. नाईकवाडे यांनी आपले म्हणणे त्वरित कौन्सिलकडे मांडावे, अन्यथा कडक कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. रझवी यांच्या निवृत्तीनंतर डॉ. बी.एस. नाईकवाडे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर शासनाकडून आले. त्यांना महापालिका एवढी आवडली की, त्यांनी कायमस्वरूपी महापालिकेतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्राणिसंग्रहालयाचा पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत अनेक प्राणी मरण पावले आहेत. अनेक वादातही ते अडकले. रेणू या वाघिणीच्या तीन पिलांना वाचविण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून दोन वर्षांपूर्वी त्यांना निलंबितही करण्यात आले होते. अलीकडेच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने त्यांची वन विभागाकडून चौकशी सुरू केली आहे. एक काळ्या तोंडाचे माकड त्यांनी प्राणिसंग्रहालयात कोंडून ठेवले आहे. या मोठ्या संकटातून सुटका होण्यापूर्वीच महाराष्टÑ व्हेटर्नरी कौन्सिलने तर त्यांच्यावर बॉम्बगोळाच टाकला आहे.महाराष्टÑातील प्रत्येक पशुवैधक डॉक्टरला व्हेटर्नरी कौन्सिलकडे नोंदणी करावीच लागते. दर पाच वर्षांनंतर या रजिस्ट्रेशनचे नूतनीकरणही करावे लागते. २०१२ पासून नाईकवाडे यांनी नूतनीकरणच केलेले नाही. त्यामुळे त्यांना कायद्यानुसार औषधोपचार करताच येत नाहीत. महापालिकेत मागील पाच वर्षांपासून डॉ. नाईकवाडे राजरोसपणे प्राण्यांवर औषधोपचार करीत आहेत.प्राणिसंग्रहालयाची परवानगी संकटातसिद्धार्थच्या प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. नाईकवाडे यांनी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचीही दिशाभूल केली आहे. तीन वर्षांपूर्वीच प्राणिसंग्रहालयाचा सुधारित आराखडा प्राधिकरणाला सादर केला.आजपर्यंत प्राणिसंग्रहालयाला वाढवून जागा देण्यात आलेल्या नाहीत. दोन महिन्यांपूर्वीच प्राधिकरणाने महापालिकेला प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द का करण्यात येऊ नये, म्हणून नोटीस पाठविली आहे. त्यानंतरही नाईकवाडे यांनी कोणतीच कारवाई केली नाही.कौन्सिलच्या नोटीसचा आशयआपण राज्य पशुवैद्यक परिषदेचे वैध नोंदणीकृत पशुवैद्यक आहात काय? आहात तर नोंदणी क्रमांकासह पुरावा सादर करा.वेतनवाढीसाठी नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे, आजपर्यंत आपणास नोंदणीचे नूतनीकरण करण्याची गरज का वाटली नाही.भारतीय पशुवैद्यक कायदा १९८४ चे कलम ५६ व ५७ अन्वये परिषदेचे नोंदणीकृत पशुवैद्यक नसताना पशुवैद्यकीय सेवा देणे हा गंभीर गुन्हा आहे. आपल्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई का करण्यात येऊ नये.आपण आजपर्यंत दिलेल्या पशुवैद्यकीय सेवा अवैध असल्याचे ग्राह्य का धरण्यात येऊ नये, आपली नोंदणी कायमस्वरूपी का रद्द करण्यात येऊ नये.
प्राणिसंग्रहालय संचालकांना राज्य पशुवैद्यक परिषदेची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:24 IST
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. भागवत सोपानराव नाईकवाडे यांना महाराष्टÑ व्हेटर्नरी कौन्सिलने नोटीस बजावली आहे. कौन्सिलकडे २०१२ पासून आजपर्यंत त्यांनी रजिस्ट्रेशनचे नूतनीकरणच केलेले नाही. नियमानुसार ते सध्या डॉक्टर नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा अधिकारही नाही.
प्राणिसंग्रहालय संचालकांना राज्य पशुवैद्यक परिषदेची नोटीस
ठळक मुद्देपाच वर्षांपासून नोंदणीच नाही : नियमबाह्यपणे प्राण्यांवर औषधोपचार केल्याचा ठपका; संचालक पुन्हा अडचणीत